शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही पायाला काळा धागा बांधलाय? ३ ग्रहांचे मिळेल पाठबळ; पाहा, योग्य पद्धत अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 9:36 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्रात अनेकविध प्रश्न, समस्या, अडचणी यांवर नानाविध प्रकारचे उपाय सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रविषयक पुस्तकात, ग्रंथात याची नोंद आढळून येते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करून काही उपाय सांगितले जातात.
2 / 12
अनेकदा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे पाहून आपल्या मनाने काही उपाय करताना पाहायला मिळतात. मात्र, त्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. कारण, प्रत्येक माणसाप्रमाणे त्याची कुंडली, कुंडलीतील ग्रह, त्यांची स्थाने भिन्न असतात.
3 / 12
त्यामुळे असे काही उपाय किंवा काही गोष्टी धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यासह त्याची योग्य पद्धत, तुमच्यावर होणारे परिणाम याची खात्री करून घ्यावी, असे सांगितले जाते.
4 / 12
समस्या, अडचणीतून मार्ग मिळावा, यासाठी रत्ने धारण करणे, धागा बांधणे असे सामान्य उपाय सांगितले जातात. मात्र, ते योग्य पद्धतीने व्हायला हवे. त्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, असे म्हटले जाते.
5 / 12
अनेक जणांच्या पायावर काळा धागा बांधलेला आपल्याला दिसतो. तुम्ही तुमच्या पायावर काळा धागा बांधलात तर तुम्ही सर्व प्रकारच्या वाईट नजरांपासून दूर राहू शकाल, असे सांगितले जाते. काळा धागा कसा बांधला जातो आणि त्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया...
6 / 12
शनिदेव अत्यंत क्रोधित आणि क्रूर मानले जातात. शनिदेवाने तुमच्यावर कोणताही प्रतिकूल प्रभाव पडू नये. तसेच शनिदोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी पायाला काळा धागा बांधावा, असे म्हटले जाते.
7 / 12
शनीच्या प्रतिकूल प्रभावाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. तसेच अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. हे सर्व तुमच्यासोबतही होत असेल तर पायात काळा धागा बांधून तुम्ही परिस्थितीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवू शकता, अशी मान्यता आहे.
8 / 12
शनिदेवासह राहु आणि केतुला मजबूत करण्यासाठी काळा धागा खूप प्रभावी मानला जातो. जर हे दोन्ही ग्रह तुमच्या कुंडलीत कमकुवत स्थितीत असतील तर पायावर काळा धागा बांधल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल, असे सांगितले जाते.
9 / 12
ज्योतिषशास्त्रात या दोघांनाही छाया ग्रह मानले जाते. राहु आणि केतु तुमच्या कुंडलीतील कोणत्याही शत्रू ग्रहाच्या संयोगाने तुमचे खूप नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत काळा धागा घालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे म्हटले जाते.
10 / 12
काळा धागा शनिवारच्या दिवशी धारण करावा किंवा बांधावा. काळा धागा कोणत्याही शनि किंवा भैरव मंदिरात खरेदी करावा किंवा तेथे जाऊन तो धारण करावा.
11 / 12
काळा धागा धारण केल्यानंतर शनीच्या बीज मंत्राचा २१ वेळा जप करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही तुमच्या पायाला काळा धागा बांधला असेल, तर तुमच्या गळ्यात लाल किंवा पिवळा धागा घालू नका.
12 / 12
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपणास यासंबंधी सखोल, विस्तृत माहिती हवी असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष