शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रुद्राक्ष धारण केलाय? शुभफल प्राप्तीसाठी ‘या’ मंत्रांचा जप करा; कोणते नियम पाळावेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 1:14 PM

1 / 12
रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ वापरताना दिसतात. रुद्राक्षाची माळ हा काही दागिन्यांचा प्रकार नाही. ते धारण करण्यामागे शास्त्र आहे. रुद्राक्षाची माळ वापरणारी व्यक्ती अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी लागते.
2 / 12
रुद्राक्षच्या माळेचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत. रुद्राक्ष सर्वकल्याणकारी, मांगल्य देणारा आणि आयुष्यवर्धक आहे. शुभ मुहुर्तावर मंत्राचा जप केल्यावरच कोणताही रुद्राक्ष पूर्ण विधीसह धारण करावा. जर तुम्हाला रुद्राक्षाचा लाभ हवा असेल तर मंत्रोच्चार केल्याशिवाय रुद्राक्ष कधीही धारण करू नये.
3 / 12
रुद्राक्षाचे मणी, रुद्राक्ष जपमाळ किंवा रत्नादी अभिमंत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्या योग्य व्यक्तीकडून अभिमंत्रित करून घेणे. काही कारणास्तव अशी व्यक्ती मिळाली नाही, तर स्वतः रुद्राक्षाचे आवाहन करून अभिमंत्रित करता येऊ शकते. त्यासाठी काही मंत्र दिलेले आहेत.
4 / 12
मेष किंवा तूळ राशीत सूर्य असताना, कर्क राशीत सूर्य किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी, ग्रहणाच्या सिद्धकालात, अमावस्या, पौर्णिमा आणि पूर्णतिथीला रुद्राक्ष धारण केल्याचा सर्वोत्तम लाभ मिळू शकतो. अशा व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नियमांचे पालन करून रुद्राक्ष धारण करून वापर केल्यास निश्चित परिणाम मिळतात.
5 / 12
एकमुखी रुद्राक्षाचे देवता भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी ‘ऊँ ह्नी नमः’ या मंत्राने रुद्राक्ष अभिमंत्रित करावा. दोन मुखी रुद्राक्षाची देवता अर्धनारीश्वराच्या प्रसन्नतेसाठी ‘ऊँ नमः’ हा मंत्र म्हणून रुद्राक्ष अभिमंत्रित करावा.
6 / 12
‘ऊँ क्लीं नमः’ या मंत्राने तीन मुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल. या रुद्राक्षाची देवता शिव आणि अग्नी आहे. तर, चारमुखी रुद्राक्षाची देवता शिव आणि ब्रह्मा असून, यांना प्रसन्न करण्यासाठी ‘ऊँ ह्नी नमः’ या मंत्राने रुद्राक्ष अभिमंत्रित करावा.
7 / 12
पंचमुखी रुद्राक्षाची देवता कालाग्नि रुद्राला प्रसन्न करण्यासाठी ‘ऊँ ह्नी नमः’ या मंत्राने रुद्राक्ष अभिमंत्रित करावा. तर, षष्ठमुखी रुद्राक्षाची देवता शिव आणि कार्तिकेय असून, ‘ऊँ हृी हुँ नमः’ या मंत्राने रुद्राक्ष अभिमंत्रित करावा.
8 / 12
‘ऊँ हुँ नमः’ या मंत्राने सप्तमुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल. याची देवता सप्तमातृका आणि सप्तर्षी आहेत. तर, ‘ऊँ हुँ नमः’ या मंत्राने अष्टमुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करून शिव आणि बटुक भैरव देवतेला प्रसन्न करता येऊ शकेल.
9 / 12
नवमुखी रुद्राक्षाची देवता शिव आणि देवी दुर्गा आहे. ‘ऊँ ह्नी हुँ नमः’ या मंत्राने रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल. दशमुखी रुद्राक्षाच्या देवतेला प्रसन्न करून रुद्राक्ष अभिमंत्रित करण्यासाठी ‘ऊँ ह्नी हुँ नमः’ या मंत्राचा जप करावा.
10 / 12
‘ऊँ ह्नी हुँ नमः’ या मंत्राचा जप करून एकादश मुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल. याची देवता शिव, रुद्र आणि इंद्र आहे. तर द्वादशमुखी रुद्राक्षाची देवता बारा आदित्य असून, ‘ऊँ क्रौं क्षौं रौं नमः’ या मंत्राचा जप करून रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल.
11 / 12
तेरामुखी रुद्राक्षाची देवता शिव, कार्तिकेय आणि इंद्र असून, यांना प्रसन्न करण्यासाठी तसेच रुद्राक्ष अभिमंत्रित करण्यासाठी ‘ऊँ ह्नी नमः’ या मंत्राचा जप करावा. ‘ऊँ नमः’ या मंत्राच्या जपाने चौदामुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करता येऊ शकेल. याची देवता शिव आणि हनुमान आहे.
12 / 12
जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी एकदा अभिमंत्रित रुद्राक्ष धारण केल्यावर एका वर्षाने पुन्हा एकदा अभिमंत्रित करावा, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक