Vastu Tips For Money: कुबेर दिशा कोणती? कोषवृद्धी, धनसंचय वाढीसाठी ‘या’ ५ गोष्टी करा अन् लाभच लाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 09:51 IST
1 / 12बाकी कोणत्याही गोष्टीचे सोंग आणता येतात; मात्र, पैशाचं सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते. पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य बाब आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. दररोजच्या गरजांपासून ते छान, शौकीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय भागत नाही. 2 / 12माणूस पैसे कमवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत असतो. पैसा मिळत असला, तरी त्याचा संचय होत नाही, टिकत नाही. आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते. 3 / 12वास्तुशास्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात, आपल्या कार्यालयात, कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात, याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आल्याचे सांगितले जाते. 4 / 12जीवनातील अविभाज्य बाब असलेले धन म्हणजेच पैसे योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवल्यास कोषवृद्धी, धनवृद्धी होऊ शकते. मात्र, त्यांची दिशा चुकल्यास नुकसान, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जाते. 5 / 12बहुतांश कुटुंबात तिजोरी असतेच. घरात पैसे ठेवण्याची एक जागा निश्चित करण्यात आलेली असते. तिजोरी, कपाट वा अन्य उपलब्ध साधनांनुसार पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, दागिने आणि अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेल्या असतात. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे. 6 / 12आपली धन, पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे, असे सांगितले जाते. उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी. यामुळे धन, दागिने, कोषवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात. नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 7 / 12घर बांधताना सांडपाण्याचा निचरा कोणत्या दिशेला होतोय, याबाबत दक्षता बाळण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आले आहे. घरातील सांडपाणी किंवा दुषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी, असे वास्तुशास्त्र सांगते. 8 / 12पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे. यामुळे घरात सुख, आनंद नांदून मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होते, असे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर प्रलंबित वा जुनी येणी वसूल होण्यातील समस्या दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.9 / 12आपल्याकडे बहुतांश घरात देवघर असते. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे आराध्याचे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे, याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आल्याचे दिसून येते.10 / 12उत्तर दिशेला तोंड करून केलेल्या पूजन लाभदायक मानले गेले आहे. असे केल्याने शांतता, समाधान, सुख, आनंदाची प्राप्ती होते. तसेच पूजेच्या श्रेष्ठ फलाची आणि पुण्याची प्राप्ती होते. एवढेच नव्हे, तर धन, धान्य, प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.11 / 12वास्तुदोषापासून मुक्तता आणि धनमार्ग प्रशस्त होण्यासाठी घरातील खोली किंवा हॉलमध्ये हिरवा रंगाचा समावेश आवर्जुन करावा, असे सांगितले जाते. तसेच घरात एखादे मनी प्लांट असल्यास त्याची जागा ही उत्तर-पूर्व असावी. ही दिशा मनी प्लांटसाठी शुभ मानली गेली आहे. असे केल्याने धनाची कमतरता जाणवत नाही. समृद्धी, वैभव स्थिरावते, असे म्हटले जाते.12 / 12वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा, घाण जमा होऊ देऊ नये. घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याचे शास्त्रात मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुसरून कार्य केल्यास धन, धान्य, सुख, समृद्धी, आनंद, वैभव प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते.