शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budhanilkantha Temple: नेपाळमधील शेषशायी विष्णूंचे मंदिर पाहिलेय? पाहा, अद्भूत मान्यता आणि रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 8:36 AM

1 / 12
भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन, पुरातन आहेत. अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या काही रुढी, परंपरा काळानुरुप बदल झाला असला तरी आजही तितक्याच भक्तिभावाने अनुसरल्या जातात. आपापल्या श्रद्धेनुसार भाविक देवतांना भजत असतात. (enigmatic budhanilkantha temple)
2 / 12
कोट्यवधी भाविक असलेल्या देशात हजारो मंदिरे आढळतात. नियमितपणे या मंदिरात न चुकता पूजा-अर्चा होत असते. भारताप्रमाणे शेजारील देशांतही अनेक अद्भूत, प्राचीन मंदिरे असून, जागतिक पातळीवरील भाविक, श्रद्धाळू किंवा पर्यटक अगदी आवर्जुन त्या मंदिरांना भेटी देतात. (mysterious facts about budhanilkantha temple)
3 / 12
यातील प्रत्येक जण भाविक असतोच, असे नाही. परंतु, प्राचीनता, स्थापत्यशास्त्र, महिमा ऐकूनही अनेक जण मंदिरांना भेटी देतात. भारताचा शेजारी असलेला आणि कधी काळी भारताचाच एक भाग असल्याची मान्यता असलेल्या नेपाळमध्येही अनेक प्राचीन मंदिरे, बौद्धस्तुप आढळून येतात. पैकी पशुपतीनाथाचे मंदिर तर जगप्रसिद्ध आहे.
4 / 12
नेपाळमधील अनेक भाविक भारतातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. भारतातूनही अनेक जण नेपाळमधील मंदिरे पाहण्यासाठी जातात. नेपाळमध्ये श्रीविष्णूचे असेच एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे गूढ रहस्य, अद्भूत आणि अचंबित करणारे आहे. जाणून घेऊया...
5 / 12
ज्या मंदिराबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ते मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवपुरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तलहटी या गावात आहे. श्रीविष्णू देवतेचे हे मंदिर आहे. या मंदिराचे नाव बुढानीलकण्ठ आहे. येथील एका नेपाळी राजपरिवाराला एक शाप असल्याची मान्यता आहे. त्यामुळे राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात दर्शनासाठी कधीही जात नाहीत.
6 / 12
मात्र, मंदिराच्या वैशिष्ट्यामुळे जगभरातील भाविक, पर्यटक येथे आवर्जुन येत असतात. बुढानीलकण्ठ मंदिर एका नैसर्गिक तलावात बांधण्यात आले आहे. या मंदिरातील विष्णूंची मूर्ती भव्य आहे. ११ नागांच्या शेषशैय्येवर विराजमान ही मूर्ती रहस्यमय आहे. या मूर्तीची लांबी ५ मीटर असल्याचे सांगितले जाते. ज्या तलावात ही मूर्ती आढळून आली, त्या तलावाची लांबी १३ मीटर असल्याचे सांगितले जाते.
7 / 12
शेषशैय्येवरील श्रीविष्णू एका पाय दुसऱ्या पायावर ठेवून निद्रावस्थेत आहेत. हे ११ नाग श्रीविष्णूंचे छत्र बनले आहेत. या मंदिरात श्रीहरि म्हणजेच श्रीविष्णूंसोबत महादेव शिवशंकर विराजमान आहेत. एका पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनावेळी विष बाहेर आले होते, तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी महादेवांनी ते धारण केले. विषप्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा पडला.
8 / 12
विषामुळे जळजळ वाढली, तेव्हा महादेव उत्तरेकडे गेले. तेथे एका पर्वतावर त्रिशूळाचा प्रहार केला. त्रिशूळाच्या प्रहारानंतर तेथे पाण्याचा स्रोत उत्पन्न झाला. या तलावातील पाणी पिऊन घशातील जळजळ थांबवण्याचा प्रयत्न महादेवांनी केला. तोच हा तलाव असून, आता हा भाग गोसाईकुंड नावाने ओळखला जातो. या तलावात असलेल्या श्रीविष्णूंची मूर्ती एका शेतकऱ्याला मिळाली होती.
9 / 12
गोसाईकुंडात असलेल्या या बुढानीलकण्ठ मंदिराचा वार्षिकोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव ऑगस्ट महिन्यात साजरा होतो. या शिव उत्सवावेळी तलावात महादेव शिवशंकराची प्रतिमा दिसते, असा दावा या भागातील स्थानिक आणि भाविकांकडून केला जातो. या उत्सवाला केवळ नेपाळ, भारतातून नाही, तर जगभरातील भाविक, पर्यटक या मंदिरात हजेरी लावतात.
10 / 12
येथील एका राजपरिवाला एक शाप असल्याचे सांगितले जाते. या राजपरिवारातील कोणत्याही सदस्याने बुढानीलकण्ठ मंदिरातील स्थापन असलेल्या श्रीविष्णूंच्या मूर्तीचे दर्शन घेतले, तर त्याचा मृत्यू होतो, असा शाप असल्याचा दावा केला जातो.
11 / 12
त्यामुळे या राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात जात नाही. मात्र, या मंदिरातील मूर्तीची एक हुबेहूब प्रतिकृती निर्माण करून एका मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. प्रति बुढानीलकण्ठ मंदिरात राजपरिवार दर्शन घेण्यासाठी जातो.
12 / 12
गेल्या काही कालावधीपासून नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडताना पाहायला मिळत आहेत. असे असले तरी प्राचीन संस्कृतीचा ठेवा भारतासारखाच अद्भूत आणि रहस्यमयी आहे, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :TempleमंदिरNepalनेपाळ