know about how to do gajalakshmi puja and auspicious benefits of worship on friday
Gajalakshmi Puja: यश व प्रगती साध्य करायचीय? घरच्या घरी करा गजलक्ष्मी देवीचे पूजन; पाहा, सोपी पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 8:49 PM1 / 11शास्त्र आणि पुराणांमध्ये लक्ष्मी देवीच्या अनेक स्वरुपांचे वर्णन करण्यात आले आहे. त्यातील एक स्वरुप म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी देवीच्या पूजनाने मान, सन्मान, यश प्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.2 / 11धन, वैभव आणि समृद्धीचे वरदान प्राप्त करण्यासाठी गजलक्ष्मी देवीचे पूजन शुभलाभदायक मानले जाते. आपण दररोज करत असलेल्या कष्ट, मेहनतीला गजलक्ष्मी देवीच्या पूजनाने पाठबळ मिळून उद्योग, व्यापार प्रगती होऊ शकते, असे म्हटले जाते. 3 / 11गजलक्ष्मी देवीचे स्वरुप चतुर्भुज असून, दोन्ही बाजूला गज शोभायमान आहेत. शुक्रवारी गजलक्ष्मी देवी आणि श्रीयंत्राचे पूजन करणे फलदायी मानले जाते. याशिवाय दररोज देवीला नैवेद्य अर्पण करावा, असे सांगितले जाते. 4 / 11प्रत्येक शुक्रवारी गजलक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ मानले जाते. मात्र, प्रत्येक शुक्रवारी शक्य नसल्यास महालक्ष्मी व्रताच्या तिथीला गजलक्ष्मी देवीचे पूजन करावे, असे सांगितले जाते. 5 / 11गजलक्ष्मीसह श्रीयंत्राचे पूजन करणे शुभफलदायी मानले जाते. यामुळे विरोधकांच्या कारवायांचा आपल्यावर प्रभाव पडत नाही, अशी मान्यता आहे. गजलक्ष्मी देवीचे ११ शुक्रवार व्रत केल्यास धन, धान्य, समृद्धी प्राप्त होऊ शकते. गजलक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद मिळू शकतात, असे सांगितले जाते. 6 / 11गजलक्ष्मीची पूजा करण्याची सोपी पद्धत सांगण्यात आली आहे. घरच्या घरी अगदी काही साहित्यात गजलक्ष्मी देवीचे पूजन करता येऊ शकते. कुळाचार, कुळधर्माप्रकरणे पूजन करावे.7 / 11शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकावे. पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावे. यानंतर एका चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवावे. त्यावर गजलक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.8 / 11यानंतर गजलक्ष्मी देवीसमोर श्रीयंत्र ठेवावे. शक्य असल्यास चांदीचे नाणे ठेवावे. यांतर गजलक्ष्मी देवी आणि श्रीयंत्राची पूजा करावी. देवीला उपलब्धतेनुसार फुले अर्पण करावीत.9 / 11गजलक्ष्मी देवीला धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. यानंतर देवीचे नामस्मरण करून देवीच्या ८ स्वरुपांचे ध्यान करावे. शक्य असल्यास १०८ वेळा देवीचा जप करावा. 10 / 11ॐ आघ्यलक्ष्म्यै नम:, ॐ विद्यालक्ष्म्यै नम:, ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नम:, ॐ अमृतलक्ष्म्यै नम:, ॐ कामलक्ष्म्यै नम:, ॐ सत्यलक्ष्म्यै नम:, ॐ भोगलक्ष्म्यै नम:, ॐ योगलक्ष्म्यै नम: आदी मंत्र म्हणावेत. 11 / 11गजलक्ष्मी देवीची आरती करून प्रसादाचे वाटप करावे. भक्तीभावाने नमस्कार करावा. आपल्या चुकांबाबत देवीकडे क्षमायाचना करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications