शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 1:43 PM

1 / 10
सन २०२२ संपून आता २०२३ सुरु होत आहे. सन २०२२ हे वर्ष अनेकार्थाने विशेष राहिले. काही जणांची स्वप्ने पूर्ण झाली, तर काही जणांची काही स्वप्ने अपूर्ण राहिली. नवीन वर्षात नवीन उत्साह घेऊन पुन्हा एकदा संकल्प केले जातील. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या व्यक्तींसाठी आगामी २०२३ वर्ष भरभराटीचे ठरू शकणार आहे. (how to please laxmi devi in new year 2023)
2 / 10
सन २०२३ मध्ये काही राशींवर भाग्य मेहेरबान असेल, तर काही राशींवर लक्ष्मी देवीचा वरदहस्त राहू शकेल. लक्ष्मी देवीची कृपा मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. नवीन वर्षापासून ते नियमितपणे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन धन-धान्य-समृद्धी वैभव प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. (lakshmi devi upay in 2023)
3 / 10
नवीन वर्ष आपल्यासाठी मंगलमय जाव आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी सर्वांची इच्छा असते. आपल्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. तुमच्या राशीनुसार काही खास उपाय केल्यास लक्ष्मी देवी शुभ करेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नेमके काय करावे, ते जाणून घेऊया...
4 / 10
मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी मंगळ आहे. या दोन्ही राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अडथळे, संकटे आणि समस्या असतील तर दर मंगळवारी पक्ष्यांना अन्नदान करावे. असे केल्याने खूप फायदा होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने संकटे दूर होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
5 / 10
वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामी शुक्र आहे. शक्य असल्यास शुक्रवारी गोमातेला तसेच पक्षांना अन्नदान करावे. असे केल्याने समस्या अडचणी दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे म्हटले आहे.
6 / 10
मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी बुध आहे. राहु ग्रहही कन्या राशीचा स्वामी मानला जातो. या राशीच्या व्यक्तींनी गोमाता आणि पक्षांना अन्नदान करावे. याशिवाय शक्य असल्यास दर बुधवारी ॐ गणपतये नमः मंत्राचा जप करावा आणि विष्णु सहस्त्रनामचे पठण करावे. याशिवाय गुरु मंत्राचाही जप करावा.
7 / 10
कर्क राशीचा स्वामी चंद्र मानला जातो. कर्क राशीच्या शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी पक्ष्यांना अन्नदान करावे. सोमवारी शिवलिंगावर दुधाभिषेक करावा. शक्य असल्यास गंगाजल अर्पण करावे. यानंतर ॐ त्रयम्बकम यजमहे सुगंधी पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधननामृत्यो मृक्ष्य ममृतात्। या महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे.
8 / 10
सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो. सूर्याला रोज अर्घ्य द्यावे. शक्य असल्यास सिंह राशीच्या लोकांनी दर रविवारी पक्ष्यांना अन्नदान करावे. गोमातेलाही अन्नदान करावे. गोमाता न मिळाल्यास एखाद्या गरिबाला अन्नदान करावे. तसेच गुरु मंत्राचा भरपूर जप करा.
9 / 10
धनु आणि मीन या राशींचा स्वामी गुरु आहे. त्याचबरोबर केतु ग्रहही मीन राशीचा स्वामी मानला जातो. धनु आणि मीन राशीच्या लोकांनी गुरूंचा आदर करावा. आई-वडिलांना कधीही वाईट बोलू नये. तसेच गुरु मंत्राचा जप करावा.
10 / 10
मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी शनीदेव आहे. या राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालिसाचे पठण करावे आणि दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला गुलाबाचे फूल अर्पण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य