शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेब्रुवारी फलदायी: ६ राशींना भरघोस लाभ, व्यापारात उत्तम संधी; ५ ग्रहांची कृपा, अनुकूल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:07 AM

1 / 15
फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. जानेवारी महिना बघता बघता सरला आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास या फेब्रुवारी महिन्यात ५ ग्रहांचे गोचर होणार असून, काही राशींना आगामी महिन्यात उत्तम लाभ मिळू शकतात, तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल.
2 / 15
फेब्रुवारी महिन्यात यामध्ये बुध, मंगळ, शनि, शुक्र आणि सूर्य या ग्रहांचे गोचर होणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. ५ फेब्रुवारीला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर ८ फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्तंगत येईल. ११ फेब्रुवारीला न्यायाधीश शनीदेव कुंभ राशीत अस्तंगत होतील.
3 / 15
१२ फेब्रुवारीला मकर राशीत शुक्र गोचरामुळे त्रिग्रही योग तयार होईल. यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. १९ फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. या एकूणच ग्रहस्थितीचा ६ राशींना लाभ, तर ६ राशींना संमिश्र काळ जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...
4 / 15
मेष: फेब्रुवारीची सुरुवात मोठ्या यशाने होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती तर होईल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. प्रेमसंबंधातील उदासीनताही दूर होईल.
5 / 15
वृषभ: फेब्रुवारीत काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. भांडणे आणि वादांपासून दूर राहा. प्रवास काळजीपूर्वक करा. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतील. नवीन करार करायचे असतील तर त्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकेल. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या देशाच्या व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर कालावधी अनुकूल ठरू शकेल.
6 / 15
मिथुन: फेब्रुवारी महिन्यात लाभाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतील. अनेक बाबतीत यश मिळू शकते. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शासकीय विभागांकडून अपेक्षित असलेली कामे पूर्ण होतील. नवीन निविदा इ.साठी अर्ज करावयाचा असल्यास त्या दृष्टीने ग्रह गोचर अनुकूल ठरू शकेल. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात नशीब आजमावू शकता.
7 / 15
कर्क: उत्तम यश मिळू शकेल. नवीन नोकरीसाठी केलेले प्रयत्न सकारात्मक ठरू शकतील. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर कालावधी अनुकूल ठरू शकेल. काही आव्हानात्मक प्रसंगांवर नियंत्रण ठेवू शकाल. वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
8 / 15
सिंह: फेब्रुवारीचा महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. एकीकडे काम आणि व्यवसायात वाढ होईल.तर, मानसिक अस्वस्थता सहन करावी लागू शकते. आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असेल तर कालावधी अनुकूल ठरू शकेल.
9 / 15
कन्या: फेब्रुवारीत काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. संशोधन आणि कल्पक कामात यश मिळू शकेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करू शकाल. वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. नवीन लोकांशी संवाद साधणे हिताचे ठरू शकेल.
10 / 15
तूळ: नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती करण्याची संधी मिळू शकेल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. थकीत पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी कालावधी अनुकूल राहील.
11 / 15
वृश्चिक: फेब्रुवारीचा कालावधी यशकारक ठरू शकेल. आर्थिक बाजू भक्कम होऊ शकेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. निवडणुकीशी संबंधित कोणतीही तयारी करत असाल तर ग्रहांची स्थिती अनुकूल ठरू शकेल. रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केल्यास अधिक यशस्वी व्हाल.
12 / 15
धनु: नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून काळ चांगला ठरू शकेल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. कुटुंबात शुभ कार्याचे आयोजन होऊ शकेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. हितशत्रू मदतीसाठी पुढे येतील. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होऊ शकतील. हट्टीपणा नियंत्रणात ठेवून काम करा.
13 / 15
मकर: महिन्याची सुरुवात चांगली यशकारक ठरू शकेल. जास्त घाई-गडबडीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचा पूर्ण लाभ मिळू शकेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे गोचर अनुकूल राहील.
14 / 15
कुंभ: कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतील. त्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. वादग्रस्त गोष्टींपासून दूर राहा. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक करू नका. धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल.
15 / 15
मीन: चांगले यश मिळू शकेल. वादग्रस्त प्रकरणांतून दिलासा मिळेल. कुटुंबातील मोठ्या भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. महिन्याच्या मध्यात प्रवास त्रासदायक ठरू शकतात. जास्त धावपळीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक काम आणि निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य