शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महादेवांच्या सर्वांत प्रिय राशी कोणत्या? विशेष कृपा, इच्छापूर्ती; शिवशंकर करतात रक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:47 AM

1 / 9
चातुर्मास सुरू झाला आहे. यातच आषाढ महिना सुरू असून, ऑगस्ट महिन्यात श्रावण मास सुरू होत आहे. मराठी वर्षात श्रावण आणि श्रावणातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांचे महात्म्य आणि महत्त्व मोठे आहे. उत्तर भारतातील पंचांगानुसार, तिथे श्रावण महिना सुरू झाला आहे. परंतु, महाराष्ट्रासह लगतच्या अन्य भागांमध्ये ०५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे.
2 / 9
श्रावण महिन्यात केले जाणारे रुद्राभिषेक, जलाभिषेक शुभ पुण्यफलदायी मानले जातात. श्रावण मासात शिवशंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करावे, असे सांगितले जाते. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू निद्रिस्त झाल्यानंतर महादेव शिवशंकर या सृष्टीचे चालन-पालन करतात, अशी लोकमान्यता प्रचित असल्याचे सांगितले जाते.
3 / 9
श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात जास्तीत जास्त शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्र जप, आराधना, स्तोत्रांचे पठण करावे, असे सांगितले जाते. १२ राशींपैकी ५ राशी महादेवांच्या अतिशय प्रिय मानल्या जातात. या राशींवर महादेवांची विशेष कृपा असते. या लोकांवर महादेव कधीही संकटे येऊ देत नाहीत. सदैव शुभाशिर्वाद लाभतात. मनातील इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...
4 / 9
मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. महादेव कृपेने या राशीच्या लोकांची कामे होऊ लागतात. शिवाच्या आशीर्वादाने करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. भगवान शिव त्यांच्या शुभ कार्यात येणारा प्रत्येक अडथळा दूर करतात. या राशीचे लोक खूप नाव कमावतात.
5 / 9
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीची देवता शिव असल्याचे मानले जाते. या राशीच्या लोकांचे भगवान शिव नेहमी रक्षण करतात. संकटे, अडचणी, आपत्तीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता, शक्ती देतात. या राशीचे लोक संवेदनशील असतात. त्यांना कोणी दुखावले तर ते ही गोष्ट विसरत नाहीत. शिवाचे शुभाशिर्वाद या राशीच्या लोकांवर असतात.
6 / 9
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे लोक आध्यात्मिक असतात. भगवान शंकराची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. हे लोक छंद आणि आनंदासाठी भरपूर पैसा खर्च करतात. या लोकांना लक्झरी लाइफ जगणे आवडते. भगवान शिव नेहमी या राशीच्या लोकांच्या पाठीशी उभे असतात. भगवान शिव प्रतिकूल परिस्थितीत रक्षण करतात. शुभकृपेचा वरदहस्त कायम असतो.
7 / 9
मकर: या राशीचे स्वामी शनीदेव आहेत. शनीदेव भोलेनाथांना गुरू मानतात. भगवान शंकराच्या कृपेने शनीला नवग्रहांचा न्यायाधीश पद प्राप्त झाले, असे मानले जाते. या राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक नशिबापेक्षा मेहनतीवर जास्त विश्वास ठेवतात. जे काम हाती घेतात, ते मेहनत करून पूर्ण करतात. भगवान शिव प्रत्येक कठीण प्रसंगी रक्षण करतात.
8 / 9
कुंभ: या राशीचे स्वामी शनीदेव आहेत. या राशीवरही भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद असतो. ही रास भोलेनाथांना विशेष आणि सर्वाधिक प्रिय आहे. भगवान शिव या राशीच्या लोकांचे रक्षण करतात. आनंद आणि समृद्धी देतात. प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता महादेव देतात. प्रामाणिक असतात. इतरांना मदत करण्यात तत्पर असतात. भगवान शिव आपल्या जीवनात मोठे यश प्राप्त करतात.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास