शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माहीवर राहुकृपा! ५ राजयोगांचे वरदान, कॅप्टन कूल MS Dhoni झाला क्रिकेटचा बादशाह; पाहा ग्रहबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:56 AM

1 / 15
१९८३ नंतर भारताला वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकवणारा आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारा क्रिकेटचा बादशाह म्हणजे MS Dhoni. महेंद्रसिंह धोनी याला भारतीय संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार मानले जाते. टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यापासून ते अनेक खिताब धोनीने भारताला मिळवून दिले.
2 / 15
०२ एप्रिल २०११ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ नंतर विश्वचषक जिंकला. कॅप्टन कूल माहीची कुंडली काय सांगते, कोणते राजयोग धोनीच्या कुंडलीत असल्याचे सांगितले जाते. प्रचंड मेहनत, जिद्द, संघर्षासह धोनीला ग्रहांचे पाठबळ कसे मिळाले, ते जाणून घेऊया...
3 / 15
महेंद्रसिंह धोनीचा जन्म ०७ जुलै १९८१ रोजी झाला. त्याचे वडील मॅकॉन कंपनीत काम करत होते आणि कंपनीने दिलेल्या क्वार्टरमध्ये राहत होते. कन्या लग्न असलेल्या धोनीच्या कुंडलीत ग्रहांचा नवग्रहांचा राजा सूर्यासोबत बुध दहाव्या स्थानी विराजमान आहे. यामुळे बुधादित्य योगासह, पाच महापुरुषांपैकी एक, भद्र योग तयार होत आहे.
4 / 15
भद्र योगात जन्मलेले लोक सिंहासारखे पराक्रमी आणि स्थिर बुद्धी असतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. धोनीला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. बॅडमिंटन आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ होते. फुटबॉलमध्ये गोलकीपर होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण, नियतीने त्याला क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक बनवले.
5 / 15
सन १९९२ मध्ये एकदा क्रिकेट सामन्यात यष्टिरक्षक गैरहजर होता, तेव्हा शिक्षकांनी धोनीला यष्टीरक्षक बनवले. तेव्हापासून धोनी क्रिकेट खेळू लागला. धोनीची क्रिकेट कारकीर्द सुरू झाली, तेव्हा तो १७ वर्षांचा होता. कुंडलीतील नवव्या स्थानी असलेल्या मंगळ ग्रहाच्या शुभ योगामुळे धोनीचे नशीब पालटले आणि त्याला क्रीडा कोट्यातून रेल्वेत सरकारी नोकरी मिळाली. तेव्हा शुक्राची अंतर्दशा सुरू होती. भाग्याचा स्वामी असलेला शुक्र धोनीच्या कुंडलीत ११ व्या स्थानी आहे.
6 / 15
२३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेश विरुद्ध सामना खेळून धोनीची भारतीय क्रिकेट संघातील एकदिवसीय कारकीर्द सुरू झाली. या सामन्यात आणि पुढच्या काही सामन्यांमध्ये तो विशेष काही करू शकला नाही. एप्रिल २००५ मध्ये धोनीने विशाखापट्टणम येथे पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला तेव्हा त्याला विशेष यश मिळाले.
7 / 15
सन २००२ मध्ये धोनीची राहुची महादशा सुरू झाली. धोनीच्या कुंडलीत राहु अकराव्या स्थानी आहे. अकराव्या स्थानी सर्व ग्रह शुभ फल देतात, असे मानले जाते. त्यामुळेच क्रूर आणि मायावी मानल्या गेलेल्या राहुने धोनीवर शुभ फलांचा वर्षाव केला. राहु खूप हट्टी ग्रह मानला गेला आहे. आयुष्याच्या त्या टप्प्यावर जेव्हा करिअर घडत असते, तेव्हा अकराव्या स्थानी असलेल्या राहुची कृपा झाली. हे सौभाग्याचे लक्षण आहे.
8 / 15
२४ सप्टेंबर २००७ चा दिवस धोनीसाठी संस्मरणीय ठरला. या दिवशी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी गुरुची अंतर्दशा सुरू होती. धोनीच्या कुंडलीत शनी-गुरुची युती लग्न स्थानी आहे. षष्ठेश संघर्ष आणि स्पर्धेत यश देतो. यावेळी पुन्हा राहुचे पाठबळ मिळाले. जो अंतर्दशानाथ गुरूपासून अकराव्या स्थानी असून, यशकारक मानला गेला आहे.
9 / 15
धोनीच्या क्रीडा जीवनातील सर्वोच्च दिवस ०२ एप्रिल २०११ होता, जेव्हा भारताने त्याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. धोनीने लहानपणापासून देव मानले होते, तो सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळला. कोणासाठीही असा दिवस आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो. सर्व काही साध्य झाले, असे वाटण्याचा दिवस असतो.
10 / 15
धोनीच्या कुंडलीत दशमेश दशम स्थानात असून अनेक महत्त्वाचे योग जुळून येत आहेत. यात बुधादित्य राजयोग, भद्रपुरुष योग, अमलाकीर्ती योग यांचा समावेश आहे. जेव्हा धोनीने विश्वचषक जिंकला, तेव्हा त्याच्या राहुच्या महादशेत बुधाची अंतर्दशा सुरू होती. हा बुध लग्न स्थान आणि चंद्र या दोन्हींपासून दशमात आहे. दहावे स्थान महान यश आणि प्रगतीचे स्थान आहे. ज्याने धोनीला मोठे यश मिळवून दिले, असे म्हटले जात आहे.
11 / 15
यावेळी केतुची दशाही होती. लघू पराशरीनुसार, त्रिकोणात बसलेला केतू जर केंद्रस्थानी अधिपती आहे, तर तो राजयोग कारक आहे. हे तत्त्व शब्दशः लागू झाले. यानंतर, चढ-उतारांसह धोनी क्रिकेट जगताचे आकर्षण ठरला. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
12 / 15
महेंद्रसिंग धोनीच्या कुटुंबात आई-वडील, एक मोठा भाऊ, एक मोठी बहीण आहे. ४ जुलै २०१० रोजी धोनीने साक्षीसोबत लग्न केले होते. तो प्रेमविवाह होता.
13 / 15
कुंडलीचे पाचवे स्थान पसंतीचे आहे आणि सातवे स्थान विवाह स्थान आहे. या दोन घरांचा स्वामी सातव्या स्थानी चंद्र, मनाचा कारक असलेल्या, उच्च स्थानी विराजमान आहे, जे त्यांचे प्रेम-विवाह दर्शवतो.
14 / 15
तेव्हा राहु शनी दशेत होता. प्रत्यंतर गुरूचे होते. शनीची सातव्या स्थानी दृष्टी आहे. प्रत्यंतर दशनाथ स्वतः गुरु आहेत. नवमांश कुंडलीत हे तीनही ग्रह लग्नाशी जोडले गेलेले आहेत, असे सांगितले जाते.
15 / 15
सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMS Dhoniमहेंद्रसिंग धोनी