शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नववर्ष २०२३: मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी ‘हे’ उपाय करा, वर्षभर फायदा; शुभ-मंगल होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:36 AM

1 / 15
नवीन वर्ष २०२३ सुरू होत आहे. नव्या वर्षाचे स्वागत आनंदाने, उत्साहात केले जाते. नवीन आशा, अपेक्षा घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. नवीन वर्षात नवीन संकल्प केले जातात. नवीन स्वप्न पाहिली जातात. नवीन वर्षांत नवीन योजनांवर विचार केला जातो.
2 / 15
नवीन वर्षाची सुरुवात दमदार व्हावी, शुभ घटना घडाव्यात, समस्या-अडचणी शक्य तितक्या कमी याव्यात, अशी सर्वांचीच इच्छा असते. नवीन योजना सुरू करून त्या प्रत्यक्षात याव्यात, यासाठी प्रयत्न केले जातात. नवीन वर्षात अधिकाधिक यश प्राप्त व्हावे. प्रगती व्हावी. सुख-समाधान मिळावे, यासाठी माणून नेहमीच प्रयत्नशील असतो.
3 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षासाठी काही उपाय सांगितले जात आहेत. नवीन वर्षात येणाऱ्या अडचणी, समस्यांवर काही उपाय उपयुक्त ठरू शकतील. मेष ते मीन राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल नववर्ष २०२३? नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ पराक्रम आणि उत्साहाचा कारक आहे. या राशीच्या लोकांचे करिअर चांगले असू शकेल. नवीन यश प्राप्त होईल. नवीन क्षेत्रात गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत. काही कौटुंबिक समस्या असू शकतात. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात संमिश्र राहील. मेष राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानजींचे व्रत ठेवावे. जर तुम्ही व्रत ठेवू शकत नसाल तर हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण पठण करावे.
5 / 15
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांसाठी २०२३ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने चांगले असणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक चांगल्या नफ्याची अपेक्षा करू शकतात. कौटुंबिक दृष्टिकोनातून येणारे वर्ष थोडेसे प्रतिकूल असू शकेल. वर्षाच्या मध्यात आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात. एप्रिलनंतर विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. शुक्रवारी पांढऱ्या रंगाची मिठाई वा तांदळाची खीर अर्पण करावी.
6 / 15
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे. जून ते नोव्हेंबरपर्यंत खबरदारी घ्यावी. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन वर्ष व्यावसायिकांसाठी चांगले असेल. कौटुंबिक पातळीवर वर्ष चांगले जाऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष शुभ फळ देईल. मिथुन राशीच्या व्यक्तींनाा गणपती बाप्पाची उपासना करणे लाभदायी ठरू शकेल.
7 / 15
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीसाठी हे वर्ष करिअरच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. व्यावसायिकदृष्ट्याही फायदा होण्याची चिन्हे आहेत. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. नवीन वर्षात कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकते. आरोग्यासंबंधी समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. महादेवांना जलाभिषेक करावा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा.
8 / 15
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशींना करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. व्यवसायात नवीन योजनांमध्ये लाभ होईल. नोकरदारांना नवीन यश मिळण्याची अपेक्षा आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराशी सुसंवाद राखावा. दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे. विशेषत: रविवारी सूर्यपूजन करावे. हनुमान चालिसा पठण करावे. वडिलांची सेवा करावी.
9 / 15
कन्या राशीचा स्वामी बुध आहे. करिअरच्या दृष्टीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांसाठी चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना इच्छित ठिकाणी बदली करता येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगले ठरू शकते. येणारे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हे वर्ष शुभ ठरू शकते. गणपती बाप्पाचे पूजन करावे. दुर्वा अर्पण करा.
10 / 15
तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन आणि चांगले अपेक्षित आहे. नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. कौटुंबिक दृष्टीने वर्ष संमिश्र जाईल. विद्यार्थ्यांना वर्ष सकारात्मक ठरेल. देवी दुर्गेची पूजा करा. तसेच देवी लक्ष्मी, संतोषी माता यांची पूजा करा. विशेषत: शुक्रवारी विधिवत पूजन करावे.
11 / 15
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. नोकरी किंवा व्यवसायात कोणताही बदल काळजीपूर्वक करावा. व्यावसायिक स्पर्धेत लाभ होईल. गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे. रिअल इस्टेटमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, कठोर परिश्रम करावे लागतील. श्री हनुमानाची पूजा करावी. विशेषत: मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा.
12 / 15
धनु राशीचा स्वामी गुरु आहे. आगामी वर्ष आनंददायी ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने चांगले जाणार आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलपर्यंत मोठे काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायातही यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असणार आहे. कुटुंबात शुभ कार्याची चिन्हे आहेत. आरोग्य चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. श्रीविष्णूची पूजा करा. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत.
13 / 15
मकर राशीचा स्वामी शनी आहे. नवीन वर्षात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. करिअरमध्ये काहीतरी नवे मिळू शकते. आगामी वर्ष व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना यशासाठी येत्या वर्षात कठोर परिश्रम करावे लागतील. शनिवारी व्रत करावे. रामरक्षास्त्रोत्र म्हणावे. हनुमंतांचे दर्शन घ्यावे.
14 / 15
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. नवीन वर्षात उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात प्रगती होईल. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. कौटुंबिक मालमत्तेतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हे वर्ष कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीनेही चांगले जाणार आहे. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. शनिवार आणि मंगळवारी सुंदरकांड पठण करा.
15 / 15
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कोणतीही गुंतवणूक काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी सुसंवाद ठेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणारे वर्ष चांगले निकाल देणार आहे. गुरुवारी रामरक्षास्त्रोत्र म्हणावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य