know about planetary position in february 2021 and effects on zodiac signs
फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या By देवेश फडके | Published: January 31, 2021 10:51 PM1 / 6ज्योतिषशास्त्र आणि पंचागानुसार नवग्रह हे ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. नवग्रहांपैकी काही ग्रह वक्री चलनाने, तर काही ग्रह मार्गी चलनाने राशीपरिवर्तन करतात. नवग्रहांतील न्यायाधीश मानलेला शनी दीर्घकाळापर्यंत एकाच राशीत विराजमान असतो, तर चंद्र दोन ते अडीच दिवसांनी राशीबदल करत असतो. 2 / 6जानेवारी महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य या ग्रहांनी राशीपरिवर्तन केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. यामध्ये सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा समावेश आहे. हे सर्व ग्रह मार्गी चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. हे चार ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचा कसा प्रभाव राहील, याबाबत जाणून घेऊया...3 / 6फेब्रुवारी महिन्यात राशीपरिवर्तन करणाऱ्या चार ग्रहांमध्ये सर्वप्रथम बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्रौ १० वाजून ५० मिनिटांनी बुधचे राशीपरिवर्तन होणार आहे. धनु राशीतून बुध ग्रह मकर राशीत विराजमान होणार आहे. आताच्या घडीला मकर राशीत शनी, सूर्य, गुरू हे ग्रह विराजमान आहेत. बुधच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव तर काही राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. 4 / 6बुधच्या मकर प्रवेशानंतर सूर्य ग्रहाचे राशीपरिवर्तन होणार आहे. सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. १४ जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत विराजमान झाला होता. आता, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ०९ वाजून ०३ मिनिटांनी सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहे. या राशीपरिवर्तनाचा प्रभाव बहुतांश राशीच्या व्यक्तींवर दिसून येईल. तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींना मान, सन्मान, धनलाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 5 / 6फेब्रुवारी महिन्यातील तिसरे राशीपरिवर्तन शुक्र ग्रहाचे असेल. शुक्र ग्रह २१ फेब्रुवारी २०२१ रोजी ०२ वाजून १२ मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्रचे राशीपरिवर्तन बहुतांश राशीच्या व्यक्तींसाठी शुभलाभदायक ठरू शकेल. विशेष करून कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचे राशीपरिवर्तन फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 6 / 6फेब्रुवारी महिन्यातील अखेरचे राशीपरिवर्तन मंगळ ग्रहाचे असेल. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाचे ०५ वाजून ०२ मिनिटांनी मंगळ आपले स्वामित्व असलेल्या मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीत आताच्या घडीला छाया ग्रह मानला गेलेला राहु विराजमान आहे. मंगळ ग्रह नवग्रहांचा सेनापती मानला गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications