शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:02 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीच्या आधारे त्या त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्यातील अंदाज वर्तवले जातात. जन्मकुंडलीच्या आधारे एखादी व्यक्ती कशी असू शकेल, त्याच्या सवयी याविषयी तर्क लावले जाऊ शकतात.
2 / 9
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी भिन्न असतात. प्रत्येक जण अभ्यासात, कला-कौशल्य यात वेगवेगळा असतो. त्या व्यक्तीला येणारे अनुभव, त्याचा अभ्यास, कौटुंबिक परिस्थिती यातून तो माणूस घडत असतो.
3 / 9
नोकरी, कार्यक्षेत्र यामध्ये माणूस वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतो. काही जण कामात एकदम तरबेज असतात. तर काही जणांमध्ये कामासह अन्य काही अंगभूत गुण असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या सगळ्या अंगांनीही विचार केला जातो. जन्मकुंडलीतील कुठल्या स्थानी कोणता ग्रह आहे, यावरून अंदाज बांधता येऊ शकतो.
4 / 9
काही राशीच्या व्यक्ती या अगदी आपल्या मर्जीचे मालक असतात. तर, काही राशीच्या व्यक्ती अशा असतात की एकदा काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. या राशीच्या व्यक्तींना अपार यश मिळते, असे सांगितले जात आहे.
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्ती उत्साही, निडर आणि निष्ठावान असतात. त्याच वेळी, ते खूप हट्टी असतात, असे म्हटले जाते. समोरच्या व्यक्तीकडून काम काढून घेण्यात पटाईत असतात. एकदा हातात घेतलेले काम प्रमाणिकपणे, चोखपणे पार पाडतात, असे सांगितले जाते. या राशीच्या व्यक्ती हुशारही असतात. आपल्या हुशारीच्या जोरावर अनेक कामे पटापट करू शकतात.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्ती प्रामाणिक, मेहनती आणि निष्ठावान असतात. खोटे बोलणारे आणि फसवणूक करणारे लोक या लोकांना अजिबात आवडत नाहीत. त्यांच्यावर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा बदला घेतल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. या बाबतीत ते खूप हट्टी असतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच करतात.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तीही खूप हट्टी असतात. मात्र, त्याच्या याच जिद्दीमुळे त्याला आयुष्यात मोठे यशही मिळते. पण कधी कधी ते जरा जास्तच मनमानी चालवायला लागतात आणि कोणाचेही ऐकत नाहीत. यासाठी त्यांना नुकसानही सहन करायला लागते, असे म्हटले जाते.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्ती हेतूने दृढ असतात. ते जे ठरवतात ते करूनच ते दाखवतात. ते आव्हानांना घाबरत नाहीत किंवा स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. त्यांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. या आडमुठेपणामुळे त्यांना कधी-कधी नुकसानही सहन करावे लागते.
9 / 9
सदर माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, जन्मकुंडलीचा अभ्यास केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीबद्दल कथन केले जाऊ शकते. ढोबळमानाने राशींचे स्वभाव सांगितले गेले असून, ग्रहांच्या प्राबल्यानुसार, त्यात बदल होत असतो, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य