शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 3:08 PM

1 / 9
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याविषयीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. माणसाच्या जन्म कुंडलीचा अभ्यास करून अनेक गोष्टी समजावून घेतल्या जाऊ शकतात.
2 / 9
प्रत्येक कुलुपाची चावी वेगळी, तसे प्रत्येक रास तिचे स्वभाव, वैशिष्ट्य वेगवेगळे असते. तसेच त्या त्या राशीच्या व्यक्तींमध्येही कमी अधिक प्रमाणात गुण-दोष आढळून येत असतात.
3 / 9
प्रत्येक व्यक्तीत काही उत्तम गुण असतात, तर काही दुर्गुण असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, असे म्हटलेलेच आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीचा अभ्यास करून एखाद्या माणसाचे गुण-दोष, स्वभाव, भूत-भविष्यातील घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो.
4 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीच्या व्यक्ती या अत्यंत निष्ठावान असतात. एका शब्द दिला की, तो पाळल्याशिवाय शांत बसत नाहीत. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींमध्ये असे विशेष स्वभाव-गुण आढळून येतात, ते जाणून घेऊया...
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्ती निष्ठावान मानल्या जातात. आपल्या जोडीदाराशी ते एकनिष्ठ राहतात, असे सांगितले जाते. या राशीच्या व्यक्ती विश्वास ठेवण्यात पात्र असतात. आयुष्यात स्थिरता यांना महत्त्वाची वाटते. त्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना कुटुंब, माणसे, गोतावळा अधिक आवडतो, असे मानले जाते. या राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. आयुष्यभर त्याची साथ देतात. जीवनात कितीही चढ-उतार आले, तरी या राशीच्या व्यक्ती साथ सोडत नाहीत, असे सांगितले जाते.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्ती आदर्शवादी असल्याचे मानले जाते. वास्तववादापेक्षा स्वप्नात त्या अधिक रमतात, असे म्हटले जाते. या राशीच्या व्यक्ती आपल्या दाम्पत्य जीवनात आनंदी असतात. जोडीदाराला खुश ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. मात्र, या राशीच्या व्यक्ती प्रामाणिक जोडीदाराच्या शोधात असतात, असे सांगितले जाते.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्ती निष्ठावान मानल्या जातात. या राशीच्या व्यक्ती नातेसंबंधात प्रेम आणि बांधिलकीने परिपूर्ण असल्याचे म्हटले जाते. जोडीदाराला कायम पाठिंबा देतात. जोडीदारावर प्रेमही खूप करतात, साथ देतात, असे सांगितले जाते.
9 / 9
सदर माहिती ज्योतिषीय मान्यता आणि सामान्य गृहीतकांवर आधारलेली असून, तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. तज्ज्ञ मंडळी कुंडलीचा अभ्यास करून योग्य तो उपाय वा सल्ला देऊ शकतात, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य