शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra: तुमच्या घरी आहे का ‘पैशांचे झाड’! एकतरी रोप लावा अन् शुभलाभ, समृद्धी मिळवा; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 2:12 PM

1 / 13
मानवी जीवनात जगण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा. रोजच्या किमान जगण्यासाठी पैसा असणे गरजेचे असते. अधिक कष्ट, मेहनत, परिश्रम करूनही अपेक्षेप्रमाणे पैसा मिळत नाही. आताच्या घडीला पैसा सर्वस्व असल्यासारखे झाले आहे. प्रत्येक गोष्टीत पैसा हा लागतोच. ज्याला पाहावं, तो पैशांच्या मागे धावताना दिसतो. (Vastu Shastra)
2 / 13
पैसे झाडाला लागत नाही, असे आपण वारंवार ऐकतो. किंबहुना कोणतीच गोष्ट पैशांशिवाय पूर्ण होत नाही. सगळ्या गोष्टींची सोंग आणता येतात; पैशाचं नाही, अशी उक्ती प्रसिद्ध आहे. दररोजच्या गरजांपासून ते छान, शौकीनपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय चालत नाही. (tree of money as per vastu shastra)
3 / 13
वास्तुशास्त्रात यासंदर्भात काही उल्लेख असल्याचे आढळून येते. वास्तुशास्त्रात अशी काही झाडे, रोपटी सांगण्यात आली आहे, जी घरात लावणे म्हणजे पैशांचे झाड लावण्यासारखे आहे, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रात काही रोपटी, वृक्षे, रोपटी यांना धन, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य यांच्याशी निगडीत असल्याचे सांगितले जाते.
4 / 13
गेल्या प्रदीर्घ कालावधीपासून मनीप्लांट हे अतिशय लोकप्रिय झालेले आहे. मनीप्लांटची वेल ही दिसायला अतिशय मनमोहक असते. तसेच मनीप्लांट वातावरण शुद्ध करण्याचे कामही करते, असे सांगितले जाते. आग्नेय दिशेला मनीप्लांट लावावे, असे म्हटले जाते.
5 / 13
या दिशेला लावलेले मनीप्लांट अधिक बहरते. मनीप्लांट घरात लावल्याने कधीही पैशांची चणचण भासत नाही. पैशांची आवक चांगली राहते. यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते. पैसे नाहीत, म्हणून एखादे काम अडून राहत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, मनीप्लांट घरात लावणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
6 / 13
वास्तुशास्त्रानुसार, शमीचे झाडे हे अत्यंत खास मानले जाते. शमी महादेव शिवशंकरांचा सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते. तसेच गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींमध्येही शमीचा समावेश असतो. शमीचे झाड अंगणात लावल्यास दारिद्र्य दूर होते, अशी लोकमान्यता प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
7 / 13
सोमवारी महादेव शिवशंकरांना शमी पत्री आणि फुले वाहिल्यास घरात सुख, समृद्धी येते, असे म्हटले जाते. शमीच्या वृक्षाला पैशाच्या झाडाची उपमा दिली जाते. कारण शमीच्या झाडामुळे घरातील पैशाची चणचण कमी होऊन समृद्धता नांदू शकते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
8 / 13
वास्तुशास्त्रात मनी ट्री नावाचे रोपटे आताच्या घडीला अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. याची उत्पत्ती अमेरिकेत झाल्याचे सांगितले जाते. फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात या मनी ट्रीला अत्यंत खास मानले गेले आहे. आजच्या आधुनिक काळात ऑनलाइनवर किंवा काही नर्सरींमध्ये मनी ट्री आपल्याला सहजगत्या मिळू शकते.
9 / 13
मनी ट्री आणून घरात लावल्याने अनेक लाभ मिळू शकतात. फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात याचे अनेक फायदे, उपयोग सांगितले गेले आहेत. त्यामुळे मनी ट्री घरात लावणे उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते.
10 / 13
वास्तुशास्त्रानुसार, अश्वगंधा अतिशय समृद्धशाली मानले गेले आहे. अंगणात अश्वगंधा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे. यामुळे अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात.
11 / 13
काही ठिकाणी अश्वगंधा हे देवाच्या पूजेतही वापरले जाते. वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदात अश्वगंधांचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. यामुळे घरात अश्वगंधा लावणे उपयुक्त ठरू शकते, असे म्हटले जाते.
12 / 13
वास्तुशास्त्रानुसार, श्वेतार्क सौभाग्याचे सूचक मानले जाते. श्वेतार्कला पांढऱ्या शुभ्र रंगांची फुले येतात. यातून पांढऱ्या रंगांचा द्रव स्रवत असतो. घरात अशा प्रकारचे रोपटे लावणे योग्य मानले गेलेले नाही. मात्र, श्वेतार्क बालकनी किंवा अंगणात लावले जाऊ शकते, असे सांगितले जाते.
13 / 13
श्वेतार्कला गणपतीचे प्रतीक मानले गेले असून, घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात अनेक लाभ सांगितले गेलेले असल्याने श्वेतार्क घराच्या बालकनीत किंवा अंगणात लावणे उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रMONEYपैसाPlantsइनडोअर प्लाण्ट्सAstrologyफलज्योतिष