know about these 5 zodiac signs always have kuber dev blessings and gives immense wealth and success
‘या’ राशींवर कुबेर देवाची कायम कृपा! पैसे कमी पडत नाही, लाभच लाभ होतात; तुमची रास आहे का यात? By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:59 AM1 / 9भारतीय संस्कृती आणि पुराणांनुसार, अनेकविध देवांची उपासना केली जाते. यापैकी कुबेर संपत्ती आणि समृद्धीची देवता मानली जाते. कुबेराची पूजा केल्याने आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत, अशी मान्यता प्रचलित आहे. कुबेर देवतांचे खजिनदार मानले गेले आहे. दिवाळीत लक्ष्मी देवीसोबत कुबेर देवाचीही पूजा करण्याची परंपरा आहे.2 / 9कुबेर देव यांना विशेष महत्त्व आहे, ते देवतांचे खजिनदार आणि यक्षांचे राजा मानले जातात. धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशासोबत कुबेर देवाचीही पूजा केली जाते, त्यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.3 / 9काही मान्यतांनुसार, अशा ५ राशी आहेत, ज्यांच्यावर कुबेर देवाचा आशीर्वाद असतो. त्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत नाही, अशी मान्यता आहे. जीवनात समृद्धता, ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. या राशींना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुबेर देवाची कृपा कायम राहते, अशा कोणत्या राशी आहेत? तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...4 / 9वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सुख, वैभव, कीर्ती, आदर, ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते लोकांना लवकर प्रभावित करतात. वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो, अशी मान्यता आहे. जीवनात काही आव्हानांना तोंड दिल्यावर त्यांना अपार यश प्राप्त करता येते. ज्या क्षेत्रात काम करतात, त्या क्षेत्रात नाव कमावतात. संपत्ती, समृद्धता मिळते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. नेहमी चांगल्या गोष्टी आवडतात. भौतिक सुखांनी अशा व्यक्ती वेढलेल्या असतात, असे म्हटले जाते.5 / 9कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मनमिळावू असतात. त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात. कर्क राशीचे लोक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. लवकर पराभव स्वीकारत नाही. एखाद्या गोष्टीत यश मिळाले नाही, तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो, असे मानले जाते. जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात. आयुष्यात येणारी प्रत्येक लहान-मोठी संधी सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळते, असे म्हटले जाते.6 / 9तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह कीर्ती आणि संपत्तीचा कारक आहे. प्रत्येक वाद आपल्या कौशल्याने सोडवण्यात या राशीच्या व्यक्ती पटाईत आहे. तूळ राशीचे लोक खूप मेहनती आणि लढाऊ बाण्याचे असतात. यश मिळविण्यासाठी आपली पूर्ण क्षमता लावतात. तूळ राशीच्या लोकांवर कुबेर देवाची अपार कृपा राहते, असे मानले जाते. या राशीचे लोक घरातील सदस्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुबेराच्या कृपेने या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत नाही, असे सांगितले जाते.7 / 9वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीचे लोक यश मिळेपर्यंत मेहनत करत राहतात. या गुणामुळे कुबेर देवांचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतो, असे मानले जाते. या व्यक्ती आजूबाजूच्या लोकांची साथ कधीही सोडत नाहीत. प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेतात. आपल्या प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल करण्यात ते यशस्वी होतात. त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग येतात. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही, असे म्हटले जाते. 8 / 9धनु राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पति आहे. या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि भविष्याकडे नेहमीच आशावादी दृष्टीकोन ठेवतात. प्रसन्न स्वभाव आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कुबेर देवाची कृपा त्यांच्यावर सदैव असते, अशी मान्यता आहे. या व्यक्ती प्रेरणादायी आणि महत्त्वाकांक्षी असतात. प्रत्येक कामात खूप उत्साही असतात. जीवनात नवीन स्थान निर्माण करतात. पैशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात येत नाहीत. नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाहीत. यांचा मित्र परिवार मोठा असतो, असे म्हटले जाते.9 / 9सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications