By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:27 IST
1 / 9सन २०२२ वर्षाची सांगता व्हायला काही दिवस बाकी आहेत. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आता २०२३ वर्ष सुरू होईल. सन २०२३ हे वर्ष अनेकार्थाने विशेष मानले जात आहे. या नववर्षात चार महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार आहेत. याचा मोठा प्रभाव केवळ राशी नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो.2 / 9सन २०२३ मध्ये नवग्रहांचा राजा मकर राशीतून आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान होणार आहे. यामुळे साडेसाती चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती संपुष्टात येणार असून, मीन राशीची साडेसाती सुरू होणार आहे. 3 / 9शनी देवासह नवग्रहांचा गुरु बृहस्पति राशीबदल करणार आहे. आपले स्वामित्व असलेल्या मीन राशीतून गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय, क्रूर, मायावी आणि छायाग्रह मानले जाणारे राहु आणि केतुही राशीपरिवर्तन करणार आहेत.4 / 9राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. याशिवाय अन्य ग्रह निमयित अंतराने राशीभ्रमण करतील. याचा प्रभाव अनेक राशींवर पाहायला मिळू शकेल. मात्र, केवळ व्यवसाय, नोकरी आणि करिअरच्या बाबतीत कोणत्या राशींना २०२३ मध्ये उत्तम लाभ मिळू शकतील, ते जाणून घेऊया...5 / 9मेष राशीच्या लोकांसाठी २०२३ वर्ष खूप चांगले परिणाम घेऊन येणारे ठरू शकेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरच्या दृष्टीने खूप चांगली परिस्थिती निर्माण होताना दिसते. नोकरीच्या नवीन संधीही मिळू शकतात. या काळात फक्त तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे. चांगल्या संधी हातून जाऊ देऊ नका.6 / 9सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ असणार आहे. करिअरमधील समस्या २०२३ मध्ये संपुष्टात येऊ शकतात. मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीसोबतच पगारातही चांगली वाढ होऊ शकेल. 7 / 9तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२३ वर्ष चांगले ठरू शकेल. मेहनत फळाला येऊ शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जे विद्यार्थी नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देत आहेत, त्यांनाही यश मिळू शकते. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पैशांची कमतरता भासणार नाही. करिअरच्या दृष्टीने पूर्ण यश अपेक्षित आहे.8 / 9धनु राशीची साडेसाती नवीन २०२३ या वर्षात संपणार आहे. यानंतर करिअरचे नवे दरवाजे उघडू शकतात. पगार वाढू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. वाणिज्य क्षेत्रात करिअर चांगले होऊ शकते. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्यासोबत केलेली भागीदारी तुम्हाला पूर्ण परिणाम देईल.9 / 9कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे २०२३ वर्ष खूप चांगले ठरू शकेल. उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळण्याची अपेक्षा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगतीची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. प्रगती साध्य करता येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.