शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Richest Temple In India: ‘ही’ आहेत देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थाने; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्, एकदा यादी पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 2:57 PM

1 / 13
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये श्रद्धा, भक्ती यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशभरात हजारो मंदिरे आहेत. यातील बहुतांश मंदिरे प्राचीन असून, तत्कालीन संस्कृती आणि स्थापत्य कलांचा अप्रतिम नमुना आहेत. (Top 10 Richest Temple In India)
2 / 13
देशातील हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक आपापल्या आराध्य देवतेचे दर्शन घेण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी जात असतात. देवतेचे दर्शन घेताना यथाशक्ती दानधर्मही करत असतात.
3 / 13
देशात अशी काही देवस्थाने आहे, जी इतकी प्रचंड श्रीमंत आहेत की, राज्यांचे अर्थसंकल्पही त्यापुढे फिके पडतील. या देवस्थानांमध्ये केवळ रोख, रोकड नाही, तर सोने-चांदी यांचा भंडारही मोठा आहे. कोणती आहेत ती मंदिरे? किती आहे संपत्ती, मालमत्ता? जाणून घेऊया...
4 / 13
पद्मनाभ स्वामी मंदिर, त्रिवेंद्रम - केरळ येथील त्रिवेंद्रममध्ये असलेले पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर येथील शाही परिवाराच्या ट्रस्टमार्फत केले जाते. मंदिराच्या एकूण ६ तिजोऱ्यांमध्ये तब्बल २० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. एवढेच नाही, तर गाभाऱ्यात भगवान श्रीविष्णूंची सोन्याची भव्य मूर्ती आहे, ज्याची किंमत सुमारे ५०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
5 / 13
तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश - देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी दुसरे देवस्थान म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर. हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिरात प्रतिवर्षी ६५० कोटी रुपयांचे दान भाविकांद्वारे केले जाते. या मंदिरात मिळणारे लाडू जगभरात लोकप्रिय असून, याच्या कमाईतून लाखो रुपये मंदिराला मिळतात. इतकेच नव्हे, तर बँकांमध्ये सुमारे १४ हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. तसेच नऊ टन सोन्याचे भंडार आहे.
6 / 13
साईबाबा मंदिर, शिर्डी - शिर्डीचे साईबाबा हे जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. रिपोर्टनुसार, मंदिराचे बँकांमध्ये ३८० किलो सोने, ४ हजार ४२८ किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे. तसेच १८०० कोटी रुपये जमा आहेत. सन २०१७ मध्ये श्रीराम नवमीच्या दिवशी अज्ञात भाविकाने १२ किलो सोने दान केले होते. तर प्रतिवर्षी साईबाबा मंदिराला ३५० कोटींचे दान भाविक देतात, असे सांगितले जाते.
7 / 13
वैष्णो देवी मंदिर, जम्मू-काश्मीर - वैष्णो देवी मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. तसेच भारतातील एक शक्तीपीठ आहे. या मंदिराला भाविकांकडून प्रतिवर्षी ५०० कोटींहून अधिकचे दान मिळते. लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात.
8 / 13
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई - महाराष्ट्रासह जगातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिराकडे ३.७ किलो सोने असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रतिवर्षी या मंदिराला सुमारे १२५ कोटी रुपयांचे दान भाविकांकडून दिले जाते.
9 / 13
मीनाक्षी मंदिर, मदुराई - मीनाक्षी मंदिर परिसरात ३३ हजार मूर्ती असल्याचे सांगितले जाते. मीनाक्षी मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराला सुमारे ६ कोटींचे दान भाविकांकडून अर्पण केले जाते.
10 / 13
जगन्नाथ मंदिर, पुरी - पुरी येथे असलेले जगन्नाथात मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराकडे किती संपत्ती आहे, याबाबत नेमकी माहिती कुणालाच नाही. रिपोर्टनुसार, मंदिराकडे १०० किलो सोने आणि चांदी आहे. प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना आहे. युरोपातील एका भाविकाने या मंदिरात १.७२ कोटी रुपयांचे दान केल्याचे सांगितले जाते.
11 / 13
सोमनाथ मंदिर, गुजरात - देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे सोमनाथ मंदिर. परकीय आक्रमकांनी हे मंदिर सुमारे १७ वेळा लुटल्याचे सांगितले जाते. गुजरातमधील वेरावळ येथे स्थित मंदिरात भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान दिले जाते. गुजरातमधील समृद्ध मंदिरांपैकी एक असल्याचेही म्हटले जाते.
12 / 13
काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी - देशातील सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे उत्तर प्रदेशातील वाराणसीत असलेले काशी विश्वनाथ मंदिर. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी ३० लाख भाविक येतात. तसेच २ लाख पर्यटक येतात, असे सांगितले जाते. या मंदिराच्या तीन पैकी दोन घुमट सोन्याचे आहेत. प्रतिवर्षी या मंदिराला ४ ते ५ कोटींचे दान मिळते.
13 / 13
सबरीमाला अयप्पा मंदिर, केरळ - केरळमध्ये असलेल्या सबरीमाला मंदिरात दरवर्षी सुमारे १० कोटी भाविक दर्शनाला येतात, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंदिरात पुरुषांना प्रवेश देण्यात येतो. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला देशभरात चर्चिला गेला होता.
टॅग्स :TempleमंदिरIndiaभारत