know about these gemstones is useful and auspicious for job and career as per astrology
नोकरी, करिअरमध्ये उत्तम यश हवेय? 'हे' रत्न ठरेल उपयुक्त व लाभदायक By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 1:36 PM1 / 15संपूर्ण जगभरात विद्यादानाचे प्रचंड ज्ञानकुंड नेहमीच प्रज्वलित असतो. जग नेहमी बदलत असते. व्यक्तिमत्त्व किंवा बाह्य जगताच्या विकासासाठी बदल आवश्यक असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले की, मग नोकरी, करिअर यांच्यामागे लागले जाते. 2 / 15आधुनिक जगतात, तर विद्यार्थीदशेत असतानाच करिअर, व्यवसाय, व्यापार, नोकरी यांना डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने आणि पद्धतीचे शिक्षण घेण्यावर भर दिला जातो. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी बहुतांश विद्यार्थी कठोर मेहनत आणि अथक परिश्रम घेत असतात. कारण यावरच भविष्याचा पाया रचला जाणार असतो.3 / 15मेहनत आणि परिश्रम घेऊनही यश पदरात पडतेच असे नाही. अशावेळी अनेकजण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. ज्योतिषशास्त्रात रत्नांना विशेष महत्त्व आहे. रत्नांच्या वापराचा जीवनावर परिणाम होऊ शकतो, असे शास्त्र सांगते. एखाद्या क्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करायचे असतील, तर कोणते रत्न धारण करावे, याबाबत विस्तृत विवेचन शास्त्रात आढळून येते.4 / 15कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत असेल, तर व्यक्तीला रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. नोकरी आणि करिअरमध्ये चांगले यश हवे असेल, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्यासाठी काही रत्ने उपयुक्त तसेच लाभदायक ठरू शकतात, असे सांगितले जाते. नेमके कोणते रत्न कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकते? जाणून घेऊया... (gemstone for job)5 / 15पुष्कराज हे गुरुचे रत्न मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु कमकुवत असेल, तर पुष्कराज रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. पुष्कराज रत्न धारण केल्यास कुंडलीतील गुरु मजबूत होण्यास मदत होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 6 / 15एखाद्या व्यक्तीला राजकीय क्षेत्रात यश व प्रगती साध्य करायची असेल, तर त्या व्यक्तीने पुष्कराज रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. तसेच यामुळे मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकतो. आध्यात्मिक आवड वाढीस लागते, असे म्हटले जाते.7 / 15माणिक सूर्याचे रत्न मानले जाते. सूर्य हा नोकरी, करिअर यांचा कारक ग्रह मानला जातो. माणिक रत्न परिधान केल्यास पराक्रम, साहस वृद्धिंगत होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी माणिक रत्न धारण करावे, असा सल्ला दिला जातो.8 / 15नोकरीत पदोन्नती किंवा सरकारी विभागातून लाभ मिळवायचे असल्यास त्या व्यक्तीने माणिक रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. तसेच याच्या वापरामुळे रक्तासंबंधी व्याधी दूर होऊ शकतात, असे म्हटले जाते.9 / 15पाचू बुधचे रत्न मानले जाते. यामुळे स्मरणशक्ती वाढते, अशी मान्यता आहे. परंतु, योग्य सल्ल्यानंतरच पाचू परिधान करावे, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला टॅक्स, डॉक्टर, सनदी लेखापाल, शिक्षण, बँकिंग, व्यापार किंवा प्रवचन, कीर्तन क्षेत्रात यश व प्रगती साध्य करायची असेल, तर त्या व्यक्तीने पाचू धारण करावे, असे सांगितले जाते. 10 / 15हिरा शुक्राचे रत्न मानले जाते. शुक्र सुख, सुविधा यांचा स्वामी मानला जातो. एखाद्या व्यक्तीला कला, चित्रपट, मीडिया, गायन, ग्लॅमर तसेच मॉडलिंग यांसारख्या क्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करायचे असतील, अशा व्यक्तींनी हिरा रत्न धारण करावे, असे सांगितले जाते.11 / 15हिरा परिधान केल्यास सुख, ऐश्वर्य वृद्धिंगत होते. वैवाहिक जीवन आनंदी, सुखमय होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मात्र, योग्य सल्ल्यानुसारच हिरा परिधान करावा, असे सांगितले जाते.12 / 15पोवळे मंगळाचे रत्न असल्याचे मानले जाते. त्यामुळे शक्यतो मंगळवारीच हे रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. पोलीस किंवा लष्करी सेवेत, वकिली, न्यायप्रणाली, प्रशासकीय सेवा यांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांनीही पोवळे परिधान करावे, असे सांगितले जाते. पोवळे धारण करण्यापूर्वी योग सल्ला घेणे आवश्यक असते, असे म्हटले जाते.13 / 15तंजेनाइट हे नीलम रत्नाचे उपरत्न आहे. शनीची कृपादृष्टी आणि शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी सदर रत्न परिधान करण्यास सांगितले जाते. शनी ढिय्या दशा आणि साडेसातीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी हे रत्न धारण करणे उपयुक्त ठरते, अशी मान्यता आहे. 14 / 15एखाद्या व्यक्तीला आकर्षणाचे केंद्र व्हायचे असेल, तर त्या व्यक्तीने तंजेनाईट रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. मात्र, हे रत्न धारण करण्यापूर्वी योग्य सल्ला अवश्य घ्यावा, असे सांगितले जाते.15 / 15ज्योतिष हे एक शास्त्र आहे. अनेकांचा यावरील अभ्यास, मते, अनुभव, निरीक्षणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी योग्य सल्ला, मार्गदर्शन घ्यावे, असे आवर्जुन सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केल्यानंतर त्यासाठी कोणते रत्न योग्य, उपयुक्त व लाभदायक ठरू शकते, याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications