शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:08 PM

1 / 12
तुलसी विवाह झाल्यानंतर पुन्हा एकदा लग्न सोहळ्यांनी वेग घेतला आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. यातच बॉलिवूडमधील हॉट कपल असलेल्या विकी कौशल आणि कटरिना कैफ यांचा विवाह अलीकडेच पार पडला.
2 / 12
हिंदू मान्यता आणि परंपरांमध्ये लग्न करायचे म्हटले की, ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांची कुंडली पाहिली जाते. जन्मकुंडलीची तुलना करून किती गुण जुळतायत याची खातरजमा करून घेतली जाते.
3 / 12
बॉलिवूडमधील सुपरस्टार विकी कौशल आणि कटरिना कैफ यांचा विवाह झाला असून, त्यांच्या कुंडलीत विशेष संयोग जुळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जुळलेले हे नातेसंबंध आणि कुंडली मिलाप अतिशय शुभ असल्याचे मानले जात आहे. (vicky kaushal katrina kaif wedding yoga)
4 / 12
विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी झाला असून, जन्मकुंडलीनुसार, रास वृषभ आहे. चंद्र वृषभ राशीत असताना त्यासोबत सूर्य आणि बुध यांचा शुभ योग जुळून आलेला दिसत आहे. (vicky kaushal kundali)
5 / 12
दुसरीकडे कटरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८४ रोजी झाला असून, तिचे जन्मस्थान हॉंगकॉंग आहे. जन्मस्थळ आणि जन्मवेळेनुसार, कटरिना कैफची रास कुंभ आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. (katrina kaif kundali)
6 / 12
विकी कौशलची वृषभ रास आणि कटरिना कैफची कुंभ रास परस्परांच्या मित्र राशी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जेमिनी ज्योतिषानुसार, कटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा आत्मकारक ग्रह बुध असून, दाराकारक ग्रह सूर्य आहे. (vicky kaushal rashi)
7 / 12
जेमिनी ज्योतिषानुसार, जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्या कुंडलीतील आत्मकारक आणि दाराकारक ग्रह परस्परांचे मित्र ग्रह असतील, तर तो अतिशय शुभ संयोग मानला जातो. विवाहानंतर विकी कौशल आणि कटरिना कैफ यांच्यात उत्तम ताळमेळ होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. (katrina kaif rashi)
8 / 12
याशिवाय दोघांचे बॉलिवूडमधील करिअर शानदार ठरू शकेल. विकी कौशल आणि कटरिना कैफ यांच्या विवाहावेळी चंद्र ग्रह कुंभ या स्थिर राशीत गुरुसह विराजमान असल्यामुळे हा योग आयुष्यातील स्थैर्यासाठी शुभ असल्याचे सांगितले जात आहे. (vicky kaushal katrina kaif wedding)
9 / 12
विकी कौशल आणि कटरिना कैफ यांच्या कुंडली जुळवून पाहिल्यास अष्टकूट पद्धतीनुसार, या दोघांचे ३८ पैकी ३२ गुण जुळून येत आहे. हादेखील अतिशय शुभ योग असल्याचे सांगितले जात आहे. (vicky kaushal katrina kaif kundali milan)
10 / 12
विकी कौशल आणि कटरिना कैफ दोघेही करिअरच्या बाबतीत यशाच्या शिखरावर आहेत. या दोघांकडे कामाची कमतरता नाही. विकी कौशलचा जन्म मुंबईत झाला असून त्याने सिनेइंडस्ट्रीत अॅक्शन डिरेक्टर आणि स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे.
11 / 12
विकी कौशलने अभिनय करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्याच्या यादीत समावेश झाला. विकी कौशल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहे. त्याने २००९ साली राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे.
12 / 12
दुसरीकडे, कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरूवात केली होती. तिने मॉडेलिंगसाठी शाळादेखील सोडली होती. तिने काही काळ ब्रिटेनमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर भारतात येऊन करिअरची सुरुवात केली. सिनेइंडस्ट्रीत तिची एन्ट्री झाल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यVicky Kaushalविकी कौशलKatrina Kaifकतरिना कैफmarriageलग्नYogaयोगासने प्रकार व फायदे