शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विपरीत राजयोग! ‘या’ ४ राशींवर शनी कृपा, यश, प्रगती अमाप; जबरदस्त लाभ, तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:09 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात नवग्रह ठराविक काळाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा राशींसह देश-दुनियेवर मोठा प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या राशीतील किंवा स्थानातील एकमेकांच्या युतीने काही योग तयार होत असतात.
2 / 9
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने सन २०२३ हे अनेकार्थाने विशेष मानले जात आहे. नवग्रहांचा न्यायाधीश मानलेला शनी ग्रह मकर या स्वराशीतून आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हे राशीपरिवर्तन होत आहे.
3 / 9
शनीच्या राशीपरिवर्तनाने एक जबरदस्त राजयोग तयार होईल. या राजयोगाला विपरीत राजयोग म्हटले जात आहे. विपरीत राजयोग हा असा राजयोगाचा प्रकार आहे जो प्रत्यक्षपणे लाभ आणि यश देत नाही. संघर्षाने आणि कुशलतेने राजयोगाप्रमाणेच मोठे यश आणि लाभ देतो. या राजयोगात एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मदतीनेही अद्भूत यश मिळते. त्यामुळे विपरीत ग्रहयोग असला तरी त्याला राजयोगाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
4 / 9
नवीन वर्षाच्या सुरुवातीला जुळून येत असलेला या विपरीत राजयोगाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकेल. कोणत्या राशीच्या व्यक्तींना यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना शनी कुंभ राशीत येईल, तेव्हा विपरीत राजयोगाच्या प्रभावामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. गेल्या वर्षी प्रमोशन झाले नसेल तर या वर्षीही प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. आर्थिक बाबतीत खूप प्रगती करू शकाल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना विपरीत खूप फायदेशीर ठरू शकेल. या काळात संघर्ष करावा लागेल. परंतु मोठ्या प्रमाणा यश मिळू शकेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक बातमी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाने चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. विरोधकांवर विजय मिळवाल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. पैसा आणि पद दोन्ही मिळेल.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींसाठी विपरीत राजयोग आनंद घेऊन येऊ शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशाने धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल. मित्र आणि नातेवाईकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. कुटुंब आणि नोकरी, व्यवसायात परिस्थिती चांगली राहील. मित्राच्या मदतीने तुम्हाला लाभाची संधी मिळेल. धाडसी निर्णय तुम्हाला नफा देईल. नशीब तुम्हाला सर्व प्रकारे साथ देईल. भरपूर पैसे कमावू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना विपरीत राजयोगाचा काळ काहीसा संघर्षाचा ठरू शकतो. परंतु संघर्षातूनच प्रगती मार्ग साध्य करता येऊ शकतील. जे काम सुरू कराल आणि आवडीने कराल, तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल आणि दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शनिदेवाच्या कृपेने जमीन आणि मालमत्तेचा लाभही मिळू शकतो.
9 / 9
शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने साडेसातीचे चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल आणि मीन राशीची साडेसाती सुरू होईल. विशेष म्हणजे या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य