know about what should we learn from lord hanuman and learn important management skills
मारुतीरायाकडून शिका अचूक मॅनेजमेंट; हमखास यश मिळवा, पाहा, टॉप १० महत्त्वाच्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 1:55 PM1 / 15भारतीय पुराणे, इतिहासात सप्तचिरंजीवांचा उल्लेख आढळून येतो. यापैकी एक म्हणजे अंजनीपुत्र हनुमान. रामायण आणि महाभारत अशा दोन्ही महानग्रंथात मारुतीरायांचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. मात्र, हनुमंत अनेक बाबतीत सर्वश्रेष्ठ होते. 2 / 15मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचे हे हनुमंतांकडूनच शिकावे. ज्ञान, बुद्धी, शिक्षा आणि सामर्थ्यासह त्यांच्यामध्ये नम्रता देखील अफाट होती. योग्य वेळी योग्य काम करणे आणि त्या कामाला व्यवस्थितरीत्या पार पाडण्याचा चमत्कारिक गुण मारुतीरायांकडे होता.3 / 15हनुमंत बालपणापासून प्रत्येकाकडून काही न काही शिकले होते. असे म्हणतात की, हनुमानाने आई अंजनी आणि वडील केसरी यांच्याबरोबरच धर्मपिता वायुदेवतेकडून शिक्षणाचे धडे घेतले होते. शबरीचे गुरु ऋषी मतंग यांच्याकडून शिक्षणाचे धडे घेतले होते. तसेच सूर्याकडून अनेक प्रकाराचे ज्ञान मिळवले. म्हणजेच काही ना काही शिकत राहायला हवे. 4 / 15हनुमानाची काम करण्याची पद्धत अनन्य होती. ते कामात दक्ष आणि प्राविण्य होते. सुग्रीवाची मदत करण्यासाठी श्रीरामाशी भेट घडवून आणली होती. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून प्रभू श्रीरामाने जी आज्ञा केली त्याप्रमाणे काम केले. आपल्या कार्यात कुशल व्यवस्थापक असून, सैन्यापासून समुद्राच्या पलीकडे जाण्यापर्यंतची सर्व कार्ये कौशल्य आणि बुद्धिमत्तेने केले हेच गुण त्यांच्या विशेष व्यवस्थापनाला दर्शवते.5 / 15हनुमानजींना जे काम देण्यात येत होते ते काम करण्याच्या पूर्वी त्याची योजना बनवायचे आणि मग त्याला कार्यान्वित करत असे. जसे की श्रीरामाने हनुमानजींना लंकेला पाठविताना सांगितले होते की ही अंगठी सीतेला दाखवून सांगा की श्रीराम लवकरच येतील. 6 / 15समुद्र ओलांडताना काय अडचणी येतील आणि लंकेत शिरताना काय अडचणी येऊ शकतात हे हनुमानाला माहिती होते. त्यांनी कठोर शब्दात रावणाला श्रीरामाचा निरोप दिला, विभीषणांना श्रीरामाकडे घेऊन आले. माता सीतेला अंगठी देऊन लंकेला पेटवले आणि त्यामधून सुखरूप परत आले. हे सर्व त्यांच्या कार्याचा एक भागच होता.7 / 15हनुमानाचे व्यवस्थापन क्षेत्र अत्यंत विस्तृत, अद्वितीय आणि योजनेचे मुख्य नियोजक म्हणून ओळखले जाते. हनुमानजींचे आदर्श सांगतात की समर्पण, वचनबद्धता आणि निष्ठेने प्रत्येक अडचणीवर मात केली जाऊ शकते.8 / 15हनुमानजींची दूरदृष्टीच होती की त्यांनी आपल्या सोप्या आणि सौम्य बोलण्याच्या गुणामुळे कपिराज सुग्रीव आणि श्रीरामाची मैत्री करविली. सुग्रीवने श्रीरामाच्या मदतीने बालीला ठार मारले तर श्रीरामाने विभीषणाच्या मदतीने रावणाला ठार मारले. हनुमानाच्या कौशल्यते आणि हुशारीने हे शक्य झाले.9 / 15या शिवाय अनेक असे प्रसंग होते ज्यासाठी हनुमानाने धोरणाने काम केले. हनुमानजी व्यवस्थापनेची शिकवण देतात आणि सांगतात की जर लक्ष मोठे असेल आणि सर्वांच्या हिताचे असेल तर सर्व प्रकाराचे धोरण अवलंबवले जाऊ शकतात.10 / 15हनुमानात खूप धाडस असून ते कोणत्याही प्रकाराच्या विषम परिस्थितीला न घाबरता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर पुढे वाढले. रावणाला शिकवण देण्यात त्यांच्या मध्ये शौर्य, दृढ निश्चय, स्पष्टता आणि निवांतपणा दिसून येतो. 11 / 15हनुमंतांच्या व्यवहारात खोटेपणा किंवा छळ कपट नाही. त्यांच्या वागण्यात पारदर्शकता दिसून येते. कुटीलपणा नाही. आपली गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याचे उत्तम कौशल्य मारुतीरायाकडे होते. 12 / 15हनुमान वानरांचे प्रमुख होते. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या त्यांच्या क्षमतेला प्रभू श्रीरामाने ओळखले होते. कठीण परिस्थितीत न घाबरता, धैर्याने आपल्या साथीदारांची मदत आणि मार्गदर्शन करू शकेल, ज्याच्यात सामर्थ्य, उत्साह, चिकाटी, परिस्थितीवर किंवा अडचणीवर मात करण्याचा संकल्प तसेच सर्वांची मते घेण्याचे आणि ऐकण्याचे गुण असतात तेच त्या गटाचे नेते किंवा प्रमुख असू शकतात.13 / 15हनुमानाच्या चेहऱ्यावर कधीही काळजी, नैराश्य किंवा दुःख दिसत नव्हते ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायचे. हनुमान कोणत्याही परिस्थितीत असो भजन करतात किंवा फळ आणि फुलांचा आस्वाद घेत असल्यास किंवा अवकाशात फिरत असल्यास त्यांची दृष्टी आपल्या शत्रूंवर असे. 14 / 15हनुमान थोरवंत सर्व शक्तिमान होते. रावणाच्या लंकेचा विध्वंस केला, असुरांना ठार मारले, शनिदेवाचे गर्वहरण केले, पौंड्रकची नगरीला उद्ध्वस्त केले. अर्जुन, भीम आणि बलरामाचे गर्व हरण केले आणि साऱ्या जगाला हे सांगितले की ते कोण असे. पण त्यांनी स्वतः कधीही दयाळूपण आणि भक्तीची साथ सोडली नाही.15 / 15रावणाशी देखील नम्रतेने वागले. तर अर्जुनाशी देखील नम्रतेने वागून बोलले पण जेव्हा अर्जुन काहीच समजून घ्यायला तयार झाले नाही, तेव्हा प्रभूच्या आज्ञे वरून आपले सामर्थ्य दाखविले. आपण कार्यसंघ करीत असाल किंवा नसाल तरीही एक व्यवस्थापक म्हणून विनम्र असणे महत्त्वाच आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications