know about which yoga will be auspicious according to your zodiac signs
Yoga and Zodiac Signs: तुमची रास कोणती? ‘ही’ योगासने ठरतील लाभदायक; जाणून घ्या By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 2:28 PM1 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे चलन, राशीपरिवर्तन यांचा मानवी आयुष्यावर प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीची रास आणि जन्मकुंडली यावरून त्याचा स्वभाग, आरोग्य याबाबत अंदाज वर्तवला जाऊ शकतो, अशी मान्यता आहे.2 / 15मानवाचे आयुष्य निरोगी, सुदृढ करायचे असेल, तर व्यायाम हवाच. व्यायामाचे अनेक फायदे, लाभ आहेत. यातही योगा, योगासने यांना वेगळे महत्त्व आहे. 3 / 15जागतिक स्तरावर भारताचा योगा स्वीकारला गेला. योगाचा प्रसार, प्रचार व्हावा, यासाठी जागतिक योग दिवस साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीने राशीनुसार योगासने केल्यास ते लाभदायक तसेच उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.4 / 15मेष ही अग्नितत्त्व असलेली रास आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी वृक्षासन, शीर्षासन करावे, असे सांगितले जाते. यामुळे आळस, नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे. 5 / 15वृषभ ही पृथ्वीतत्वाची रास आहे. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे सेतुआसन करावे, असे सांगितले जाते. तसेच या राशीचा स्वामी शुक्र आहे. दाम्पत्य जीवन, कलात्मकता, प्रतिभा, संगीत, कला यांचा कारक मानला जातो. 6 / 15मिथुन ही वायु तत्त्व असलेली रास आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी धनुरासन, प्राणायाम, शीर्षासन, बालासन करावे, असे सांगितले जाते. 7 / 15कर्क ही जलतत्त्व असलेली रास आहे. या राशीच्या व्यक्तींनी पद्मासन, भुजंगासन, नटराजासन, अनुलोम-विलोम करावे, असे सांगितले जाते. यामुळे सकारात्मकता वाढण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते. 8 / 15सिंह हीदेखील अग्नितत्त्व असलेली रास आहे. या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तींनी, सूर्यनमस्कार घालावेत. मत्स्यासन, मंडुकासन करणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. 9 / 15कन्या रास पृथ्वी तत्त्वाशी निगडीत रास असून, या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींनी अनुलोम-विलोम, मयुरासन करावे, असे सांगितले जाते. 10 / 15तुळ ही वायु तत्त्व असलेली रास असून, शुक्र या राशीचा स्वामी आहे. या राशीच्या व्यक्तींनी ताडासन, सिद्धासन करावे, असे सांगितले जाते. 11 / 15वृश्चिक हीदेखील जलतत्त्वाची रास असून, या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींनी मकरासन, ध्यानधारणा करणे लाभदायक मानले गेले आहे. 12 / 15धनु ही अग्नितत्त्व असलेली तिसरी रास आहे. या राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार, सर्वांगासन, कपालभाती यांसारखी योगासने करावीत, असे सांगितले जाते. 13 / 15मकर ही रास पृथ्वी तत्त्वाशी निगडीत असून, या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी अनुलोम-विलोम, प्राणायाम, कपालभाती यांसारखी योगासने करावीत, असे सांगितले जाते. 14 / 15कुंभ ही वायु तत्त्वाशी संबंधित रास असून, याही राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी ध्यानधारणा, प्राणायाम, कपालभाती यांसारखी योगासने करावीत, असे सांगितले जाते. 15 / 15मीन ही जलतत्त्व असलेली तिसरी रास असून, या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्तींनी गरुडासन, सूर्यनमस्कार, सर्वांगासन, कपालभाती यांसारखी योगासने करावीत, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications