शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Turtle Ring Benefits: तुम्हीही घातलीय कासवाची अंगठी? लक्ष्मी देवीच्या धनवृद्धीकारक प्रतिकाचे महत्त्व, मान्यता आणि नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 2:44 PM

1 / 15
ज्योतिषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून स्वभाव, गुणवैशिष्ट्य आणि भविष्यकथनासह काही गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो. ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून महत्त्व असल्याचे दिसून येते. (Turtle Ring Benefits)
2 / 15
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील ग्रह शुभ असतील, तर व्यक्तीला त्याचा फायदा मिळतो, अशी मान्यता आहे. मात्र, काही ग्रह प्रतिकूल असतील किंवा कुंडतील मजबूत नसतील, तर अशावेळी काही उपाय सूचवले जातात. यामध्ये प्रामुख्याने काही रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. (Turtle Ring Astrology)
3 / 15
एखाद्या व्यक्तीचा कुंडलीचा अभ्यास करून रत्न परिधान करण्यास सांगितले जाते. यातच गेल्या काही वर्षांपासून कासवाच्या आकाराची अंगठी परिधान करण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढल्याचे पाहायला मिळते. कासवाची अंगठी परिधान केल्यास धनवृद्धीचे योग प्रबळ होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Turtle Ring Astrology Benefits)
4 / 15
वास्तुशास्त्रातही कासवाच्या अंगठी महत्त्व नमूद करण्यात आले असून, ती धारण करणे शुभ मानले गेले आहे. तर अनेक शास्त्रांमध्ये कासवाची अंगठी धारण केल्याचे फायदे सांगितले गेले आहेत. कासवाची अंगठी योग्य पद्धतीने धारण केल्यास त्याचा अत्यंत शुभ प्रभाव पडतो, असे सांगितले जाते.
5 / 15
मात्र, अनेकजण फॅशन म्हणून ही अंगठी धारण करत असतात. अनेकांना याची योग्य माहिती नसते आणि त्यामुळे ती परिधान केल्याचे शुभ फळ किंवा सकारात्मक प्रभाव मिळतोच, असे नाही. कासवाची अंगठी का परिधान केली जाते? ती परिधान करण्याचे नियम, त्याचे फायदे, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया...
6 / 15
काही शास्त्रांनुसार, कासवाला लक्ष्मीचे म्हणजेच धनाचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच याचा संबंध श्रीविष्णूंनी धारण केलेल्या कूर्म अवताराशी निगडीत असल्याचे सांगितले जाते. समुद्रमंथनावेळी श्रीविष्णूंनी हा अवतार धारण केला होता. समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली होती.
7 / 15
लक्ष्मी देवीसोबत कासवाला धनवृद्धीकारक मानले जाते. कासव धैर्य, शांती, निरंतरता, सातत्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कासवाची अंगठी धारण केल्याने जीवनात सुखद बदल घडून यायला सुरुवात होते, अशी मान्यता आहे.
8 / 15
कासवाची अंगठी परिधान करण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली जाते. कासवाची अंगठी प्रथम निरशा दुधात ठेवावी. त्यानंतर गंगाजलाने ती स्वच्छ करून लक्ष्मी देवीसमोर ठेवावी. गायीच्या तुपाचा दिवा लावून लक्ष्मी स्तोत्राचे मनोभावे पठण करावे आणि त्यानंतरच कासवाची अंगठी परिधान करावी, असे सांगितले जाते.
9 / 15
असे केल्याने लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद कुटुंबावर आणि आपल्यावर कायम राहतात. ही अंगठी परिधान केल्यास आर्थिक संपन्नता येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. कासवाची अंगठी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटामध्ये घालण्याचा सल्ला दिला जातो. ही अंगठी अशा प्रकारे घातली जावी, जेणेकरून कासवाचे मुख, अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेला असेल. त्यामुळे धनवृद्धी होण्याचे योग प्रबळ होतात, असे सांगितले जाते.
10 / 15
अनेक व्यक्तींना हातातील अंगठी बोटांनी फिरवत राहण्याची सवय असते. मात्र, कासवाच्या अंगठीबाबत असे करणे अपायकारक ठरू शकते. अंगठी धारण करताना त्यावरील कासवाचे तोंड, ती अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेलाच असल्याची खबरदारी घेतली जावी. अन्यथा धनहानी होण्याचा धोका वाढतो, अशी मान्यता आहे.
11 / 15
कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्याने ही अंगठी शुक्रवारच्या दिवशी परिधान केली जावी, असे सांगितले जाते. अनेकजण योग्य माहिती आणि योग्य पद्धतीचे आचरण न करता ही अंगठी परिधान करतात. कासवाच्या आकाराची अंगठी, चांदीचा वापर करून बनवविणे शुभ मानले गेले आहे.
12 / 15
दुसऱ्या धातूत ही अंगठी बनवायची झाल्यास कासवाचा आकार चांदीचा बनवून त्यावर सोन्याचा मुलामा किंवा दुसरे कोणतेही रत्न लावावे, असे सांगितले जाते. कासव सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे लक्षण असल्याची मान्यता आहे.
13 / 15
कासवाची अंगठी वास्तुशास्त्रात शुभ मानली जाते. जीवनातील अनेक दोष दूर करून प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी कासवाची अंगठी परिधान करावी, असे सांगितले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो. दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.
14 / 15
कासवाची अंगठी संरक्षक कवचही मानली गेली असून, ती परिधान केल्यानंतर वाईट स्वप्न पडत नाहीत. तसेच जीवनात स्थैर्य, शांतता, संयम, सुख, समृद्धी कायम राहण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.
15 / 15
मात्र, घरातील स्वच्छता करतान किंवा स्वयंपाक घरातील कामे करताना ही अंगठी काढून ठेवावी. यानंतर स्वच्छ हात-पाय धुतल्यानंतर लक्ष्मी देवीसमोर ठेवून पुन्हा परिधान करावी, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र