शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हाला स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्या? लक्ष्मी देवी प्रसन्न होण्याचे संकेत; पैसे कमी पडणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:48 AM

1 / 12
स्वप्न ही मानवाला मिळालेली एक अद्भूत गोष्ट आहे. मनी वसे, ते स्वप्नी दिसे, असे म्हटलेच जाते. काही व्यक्तींना अगदी एखादी डुलकी लागली, तरी स्वप्न पडू शकते. तर काहींना रात्रभर छान झोप होऊनही स्वप्न पडेलच असे नाही. (dreams astrology)
2 / 12
स्वप्न ही माणसाला सकारात्मक, आशावादी बनवतात, असे म्हटले जाते. माणसाने आवर्जुन स्वप्न पाहावे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घ्यावी, असे सांगितले जाते. मात्र, काही स्वप्न क्षणभंगूर असतात, एकदा झोपमोड झाली की, स्वप्नात नेमके काय पाहिले हे लक्षातही राहत नाही. तर काही स्वप्न कायम लक्षात राहणारी असतात.
3 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखांपैकी एक असलेल्या स्वप्नशास्त्रात माणसाला पडणाऱ्या स्वप्नाचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून काही गोष्टींचे अंदाज बांधले जातात. एखादे स्वप्न हे त्या माणसाच्या दृष्टीने चांगले, शुभ की वाईट याबाबत सांगितले जाते.
4 / 12
स्वप्नात काही गोष्टी दिसणे हे अत्यंत शुभ संकेत मानले जातात. त्या गोष्टी स्वप्नात दिसल्या, तर नजीकच्या काळात धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
5 / 12
अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या स्वप्नात दिसल्यावर लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळू शकतात. ती प्रसन्न होऊ शकते. धनलाभाचे उत्तम योग जुळून येऊ शकतात, ते जाणून घेऊया...
6 / 12
स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तींला पिवळे रंगाचे फळ किंवा लाल रंगाचे फूल दिसणे शुभ मानले जाते. तसेच तो स्वर्णलाभाचा संकेत मानला जातो. एखाद्या व्यक्तीला श्वेत वस्त्रातील लक्ष्मी देवीचे दर्शन झाल्यास, त्या व्यक्तीवर लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीची मोठी कृपा असल्याचे म्हटले जाते.
7 / 12
काही स्वप्ने अतिशय भीतीदायक असतात. एखाद्या व्यक्तीने स्वतःला दरीत किंवा उंचावरून खाली पडताना पाहिले, तर घाबरायचे कारण नाही. कारण स्वप्नशास्त्रानुसार, हा चांगला संकेत मानला गेला आहे. अशा व्यक्ती निर्मळ बुद्धी, विचारांच्या असतात, असे म्हटले जाते.
8 / 12
तसेच हा धनलाभाचा संकेतही मानला जातो. एखाद्या व्यक्तीने आपल्या ओटीत किंवा ओंजळीत फळे व फुले पाहिली, तर लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन वृद्धिचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो, असे सांगितले जाते.
9 / 12
स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने स्वप्नात प्रचंड पाऊस पाहिला किंवा भरपावसात अग्नि प्रज्ज्वलित असलेला पाहिला, तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. अशा व्यक्तींना अपार पैसे मिळण्याचे प्रबळ योग जुळून येऊ शकतात. तशा संधी प्राप्त होऊ शकतात. तसेच लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद लाभू शकतात, असे म्हटले जाते.
10 / 12
स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने स्वतःला झाडावर चढताना पाहिले आणि तेवढ्यात त्याला जाग आली, तर तो चांगला संकेत मानला जातो. यामुळे मालमत्ता, संपत्ती खरेदीच्या इच्छा पूर्णत्वास जाऊ शकतात, असे म्हटले जाते. तसेच धनलाभाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतात. सुख, समृद्धीत वृद्धी होऊ शकते.
11 / 12
स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लक्ष्मी देवीचे दर्शन झाले आणि ती व्यक्ती लक्ष्मीपूजन करताना दिसले तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ नशिबाची आणि भाग्याची दारे खुली होऊ शकतात. नोकरदार वर्गाला पद, पैसा, पदोन्नती प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.
12 / 12
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. तुम्हाला एखादे स्वप्न पडले, तर त्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा, याचा योग्य सल्ला तज्ज्ञ व्यक्तींकडून घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.