शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makar Sankranti 2022: मकरसंक्रांती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ, भाग्योदय अन् यशकारक काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 7:06 PM

1 / 9
इंग्रजी नववर्षात पहिला येणारा मराठी सण म्हणजे मकरसंक्रांती. (Makar Sankranti 2022) मकर संक्रांतीपासून देवतांच्या दिवसांची सुरुवात होते, अशी मान्यता आहे. मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत.
2 / 9
यंदाच्या वर्षी १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांत आहे. हा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो. मकर संक्रांत संपूर्ण देशभरात विविध नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. या दिवशी नवग्रहांचा राजा सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल.
3 / 9
मकर राशीत आताच्या घडीला शनी आणि बुध विराजमान आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला १४ जानेवारी रोजी बुधादित्य योग जुळून येणार आहे. एकूणच मकर राशीतील ग्रहस्थितीचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो. ही मकर संक्रांत या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरू शकेल. (makar sankranti 2022 astrology)
4 / 9
तसेच दुसरीकडे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. यानंतर उत्तरायणास सुरुवात होते. शुभ कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ केला जातो. थंडीचा प्रभाव काहीसा गमी होऊन उबदारपणा यायला लागतो.
5 / 9
मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती साध्य करता येऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना शुभ वार्ता मिळू शकतील. कौटुंबिक जीवनात सकरात्मकता येऊ शकेल. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागू शकतील.
6 / 9
मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशीपरिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकते. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवाल. शुभ कार्याचे आयोजन करू शकाल. बौद्धिक विकास होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ठरेल.
7 / 9
मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशीपरिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना चिंतामुक्त करणारे ठरू शकेल. समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. एकाग्रता वाढेल. मुलांची काळजी दूर होईल. जोडीदाराशी उत्तम ताळमेळ जमेल. कार्यक्षेत्रातील आपली प्रतिमा सुधारेल.
8 / 9
मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल. मोकळेपणाने संवाद साधू शकाल. कुटुंबात आपली प्रतिमा सुधारेल. जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. भावंडांशी असलेले नातेसंबंध सुधारू शकतील.
9 / 9
मकर संक्रांतीला होणारे सूर्याचे राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकाल. परदेशातून काहीतरी लाभ होऊ शकेल. ज्येष्ठांची असलेले मतभेद दूर करू शकाल.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीAstrologyफलज्योतिष