शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kojagiri Purnima 2023: धनलाभासाठी कोजागिरीच्या रात्री म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र; कर्जमुक्तीला लागेल हातभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:35 PM

1 / 5
पैशांच्या मागे धावू नका असे कितीही म्हटले तरी, गरजेपुरता पैसा प्रत्येकाला हवा असतो. एवढेच काय, तर संत शिरोमणी तुकाराम महाराजदेखील या गोष्टीला दुजोरा देत 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' अर्थात चांगल्या मार्गाने पुरेसे धन मिळवा असा संदेश देतात. धनप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो तो लक्ष्मी मातेकडून. आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड मिळावी यासाठी पुढील लक्ष्मी मंत्र तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.
2 / 5
कर्जाचा बोजा खूप वाढला असेल तर महालक्ष्मी मंत्र - 'ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः' या मंत्राचा जप करा. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल. अधिक परिणामासाठी कमळाच्या बीजापासून बनवलेल्या जपमाळेने जप करा.
3 / 5
जीवन आर्थिक समस्यांनी वेढलेले असेल. तसेच उत्पन्न वाढवण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात असतील तर लक्ष्मी बीज मंत्र - 'ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नम:' चा जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते, असे ज्योतिष शास्त्र सांगते. हा मंत्रजप करतानाही कमळाच्या बीजापासून बनवलेल्या जपमाळेचा अधिक लाभ होईल.
4 / 5
जर जीवन निराशा आणि दुःखांनी घेरले असेल तर लक्ष्मी गायत्री मंत्र - 'ओम श्री महालक्ष्मीय च विद्महे विष्णु पतनयै च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम' या मंत्राचा जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व दु:ख दूर होण्यास मदत होईल. या जपासाठी स्फटिक माळेचा वापर करा.
5 / 5
मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. त्याचे उच्चारण योग्य रीतीने झाले तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या लहरींचे कवच उपयोगी पडते. ते केवळ शब्द नाहीत तर प्रासादिक मंत्र आहेत. त्याचे पावित्र्य जपले आणि मनोभावे ते म्हटले तर त्याचा लाभ नक्कीच होतो. शिवाय उपासनेने सकारात्मकता वाढते. धीर मिळतो. मनाला उभारी येते आणि ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याचा दिलासा मिळतो.
टॅग्स :kojagariकोजागिरी