शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, प्रगतीच्या अपार संधी; पद-उत्पन्नात वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:17 PM

1 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या कुंभ राशीतील संक्रमणाला कुंभ संक्रांत म्हटले जाते. आताच्या घडीला कुंभ राशीत शनी विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीचा युती योग जुळून येऊ शकेल.
2 / 9
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि राशीस्वामी स्वराशीत विराजमान आहे. पौराणिक मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी पिता-पुत्र मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी शत्रू ग्रह मानले जातात. मकर राशीनंतर कुंभ राशीत दोन शत्रू ग्रह एकत्र येण्याचा पुन्हा योग जुळून येत आहे.
3 / 9
सूर्य शत्रू ग्रहाच्या राशीत शत्रू ग्रहासोबत पुढील महिनाभर विराजमान असणार आहे. मात्र, याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. सूर्याचा होत असलेला कुंभ राशीतील प्रवेश कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना कुंभ संक्रांतीचा भरपूर लाभ मिळू शकेल. लपलेल्या कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक बाबतीत हे संक्रमण खूप महत्त्वाचे असणार आहे. आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय व्हाल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना कुंभ संक्रांती अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये चांगले नाव कमवू शकता. मानधनात लक्षणीय वाढ होऊ शकेल. नोकरदारांना अधिक अधिकार दिले जाऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला राहील. सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे कामाच्या चांगल्या संधी मिळतील. या संधीचा फायदा घ्यावा. भविष्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत मिळू शकतात.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना कुंभ संक्रांतीचा पुरेपूर फायदा मिळू शकेल. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. समाजात तुमचे नाव चांगले होईल. सर्वांकडून पूर्ण आदर मिळेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल. पन्नातही वाढ होईल. नशिबाची उत्तम साथ लाभेल. मेहनत कमी करू नका. चांगली कामगिरी कराल.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना कुंभ संक्रांतीचा काळ महत्त्वपूर्ण ठरू शकेल. करिअरबाबत खूप सक्रिय असाल. अधिक मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवन संमिश्र असणार आहे. जोडीदाराशी चांगला ताळमेळ राहील. व्यवसायातील कोणताही नवीन करार अंतिम होऊ शकतो. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल.
8 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना कुंभ संक्रांती अनुकूल ठरू शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील. नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप उपयुक्त ठरेल. तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे.
9 / 9
कुंभ राशीत केवळ दोन दिवसांसाठी त्रिग्रही योग जुळून येईल. सूर्य आणि शनी ग्रहासोबत शुक्र ग्रहही विराजमान असेल. १५ फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य