शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra: तुम्ही ‘या’ चुका करत नाही ना? लक्ष्मी देवी राहत नाही घरात; पैसा टिकतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 8:11 AM

1 / 9
कोणतंही सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत नाही, असे म्हटले जाते. माणसाला जीवन जगायला पैसा अतिशय महत्त्वाचा असतो. माणूस पैसे मिळण्यासाठी, कमावण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करताना दिसतो. (Vastu Shastra)
2 / 9
मात्र, काही जणांच्या मेहनतीला फळ मिळत नाही. कितीही कष्ट केले, परिश्रम केले, तरी अपेक्षित धनप्राप्ती होत नाही. अशावेळी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. (Vastu Shastra Tips)
3 / 9
ज्योतिषशास्त्रांच्या अनेकविध शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रात अनेकविध गोष्टी विस्तृतपणे सांगण्यात आल्या आहेत. अगदी घराच्या प्रवेशद्वारापासून ते गच्चीच्या संरचनेपर्यंत बारीक-बारीक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Vastu Shastra Lakshmi Devi)
4 / 9
घरात वावरताना आपण अनेकदा चुका करत असतो. काही चुका अनावधानाने आपल्या हातून घडत असतात. मात्र, त्या छोट्या चुकांमळे काहीवेळा मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असे म्हटले जाते.
5 / 9
आयुष्यात श्रीमंत होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु काहीवेळा यामुळे आर्थिक जीवनात समृद्धी येत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरातील चुका सुख-शांती प्रभावित करू शकतात. वास्तुच्या या चुकांमुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. परिणामी आर्थिक नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया...
6 / 9
वास्तुशास्त्रानुसार, घरातील भिंतींवरील घड्याल कधीही बंद अवस्थेत तसेच ठेवू नये. बंद पडलेल्या घड्याळातून घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. तसेच घरात कधीही तुटलेले घड्याळ ठेवू नये. बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ तत्काळ दुरुस्त करून घ्यावे, असे म्हटले जाते.
7 / 9
वास्तुशास्त्रानुसार, घरातील नळातून थेंब थेंब पडणारे पाणी, पाइपमधून वाहणारे पाणी किंवा अनावश्यक पाण्याचा अपव्यय यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. अशा वास्तुदोषांमुळे पैशाचा अपव्यय होतो, अशी मान्यता आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे त्याची अधिकाधिक बचत करावी, असे सांगितले जाते.
8 / 9
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर स्वच्छ ठेवल्याने सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी वास करते. दुसरीकडे, घर अस्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. तसेच आर्थिक नुकसानही होते.
9 / 9
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपण याबाबतीत तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रAstrologyफलज्योतिष