गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:52 IST
1 / 15आताच्या घडीला मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. मीन राशीत शनि, शुक्र, बुध, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. तर कन्या राशीतील केतुशी या सर्व ग्रहांचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. तर सूर्याचे मेष राशीत गोचर झाले असून, मेष ही सूर्याची उच्च रास मानली गेली आहे. 2 / 15कर्क राशीतील मंगळ आणि मीन राशीतील सर्व ग्रहांचा नवमपंचम योग जुळून आला आहे. तसेच मीन राशीत लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. तसेच चंद्राच्या वृश्चिक राशीतील भ्रमणामुळे त्रिकोण योग जुळून आलेला आहे. 3 / 15गुरुवारी अशा प्रकारची ग्रहस्थिती आणि योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे. याचे कोणत्या राशींवर कसे परिणाम होऊ शकतील? कोणत्या राशींना चांगले फले प्राप्त होऊ शकतील? जाणून घेऊया...4 / 15मेष: नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. चंद्रभ्रमणामुळे आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. या काळात संयम बाळगण्याची गरज आहे. वाहने जपून चालवा. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. शुक्रवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल.5 / 15वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. बेपर्वाईने वागू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. चांगले अनुभव येतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत पारडे जड राहील. चंद्रामुळे महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.6 / 15मिथुन: सुवार्ता कानी पडेल. त्यामुळे उत्साह वाढेल. समाजात मान वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. आहार आणि विश्रांती याकडे लक्ष द्या. शुक्रवार, शनिवार चांगले अनुभव येतील. कार्यक्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील.7 / 15कर्क: उन्नती होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. एखादी चांगली संधी चालून येईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. सहकारी वर्गाशी चांगले संबंध राहतील. घरी पाहुणे मंडळी येतील. काहींना पुरस्कार जाहीर होतील. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. शुक्रवार, शनिवार थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे.8 / 15सिंह: नोकरी व्यवसायात सतत व्यस्त राहाल. प्रलंबित कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वेळेचे सुयोग्य नियोजन करून प्रगती साधून घ्याल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. कामानिमित्त फिरावे लागेल. कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. बढती, बदलीचे योग येतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जुनी येणी थोड्याच प्रयत्नात वसूल होतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.9 / 15कन्या: अनुकूल परिस्थितीचा लाभ घ्या. शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी सख्य राहील. व्यवहारात दक्ष राहा. नोकरीत नवीन संधी मिळेल.10 / 15तूळ: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. मोठ्या उत्साहाने कामे कराल. योजनांना चालना मिळेल. अनेक अडचणी दूर होतील. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल वातावरण राहील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. भेटवस्तू प्राप्त होतील. चंद्र भ्रमणामुळे शुभ फळे मिळतील. महत्त्वाची कामे होतील. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.11 / 15वृश्चिक: संयम सोडता कामा नये. घाईघाईत कामे करू नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. भेटवस्तू मिळतील. धनलाभ होईल. एखादे अडलेले काम चुटकीसरशी होऊन जाईल.12 / 15धनु: थोडे संयमाने वागल्यास घवघवीत यश मिळेल. लाभ स्थानातील चंद्र भ्रमणाची शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. अनेक उत्तम लाभ होतील. महत्त्वाची कामे या काळात झटपट आटोपून घ्यावी. सावधपणे वागण्याची गरज आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नियमानुसार कामे करा. अडचणी दूर होतील.13 / 15मकर: कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. नवीन संधी चालून येतील. एखादी चांगली बातमी कळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. उच्च पद मिळू शकते. नवीन बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारा. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घ्या. क्रोधाला आवर घातला पाहिजे. लाभ स्थानातील चंद्र तुम्हाला अनेक लाभ मिळवून देईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. कायद्याचे पालन करा.14 / 15कुंभ: भाग्याची चांगली साथ राहील. एखादी सुवार्ता कानी पडेल. मन आनंदी होईल. कामाचा ताण कमी होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत वर्चस्व राहील. मोठी संधी मिळेल. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. अनेक मार्गानी आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. सफलता मिळेल.15 / 15मीन: बेपर्वाई नको. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगली बातमी कळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. पर्यटन घडेल. नवीन जबाबदारी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.