शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मी नारायण राजयोग: ८ राशींना सर्वोत्तम, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; यश-प्रगतीची संधी, शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:55 IST

1 / 12
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी बुध ग्रह शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. यानंतर बुधचा अनेक ग्रहांशी युती योग जुळून येणार आहे. तर काही राजयोगही जुळून येणार आहेत. मीन राशीत आताच्या घडीला शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत.
2 / 12
मीन रास ही शुक्र ग्रहाची उच्च रास मानली गेली आहे. बुधाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर लक्ष्मी नारायण योग आणि नीचभंग असे दोन राजयोग जुळून येत आहेत. तर बुध, शुक्र आणि राहु यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे.
3 / 12
फेब्रुवारी महिन्याची सांगता होत असताना जुळून येणारे राजयोग अनेक राशींसाठी सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
मेष: करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळतील. धावपळ करावी लागू शकते. चांगल्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने फायदेशीर योजनेवर काम करण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते.
5 / 12
वृषभ: बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक बाबींमध्येही यश मिळू शकते. समाजात आदर वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. शिक्षण क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु, नोकरी, बिझनेस यांमध्ये काहीसा प्रतिकूल प्रभाव पाहायला मिळू शकतो.
6 / 12
कर्क: भौतिक सुखे मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. बौद्धिक क्षमतेत सुधारणा होऊ शकते. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. अध्यात्माकडे कल लक्षणीयरित्या वाढू शकतो. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. वाहन, घर खरेदी करण्यात किंवा घराचे नूतनीकरण इत्यादी करण्यात यशस्वी होऊ शकता. नशीब पूर्णपणे बाजूने असेल. अनेक स्वप्ने पूर्ण करू शकाल.
7 / 12
सिंह: बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात अधिक रस असेल. कुटुंबाशी संबंधित समस्या सोडवण्यात यशस्वी होऊ शकाल. नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर झाल्यानंतर दिलासा मिळेल.
8 / 12
कन्या: अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यासोबतच, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. याशिवाय, जोडीदाराद्वारे आर्थिक लाभ मिळू शकतात. अविवाहित लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.
9 / 12
तूळ: यश प्रगती प्राप्त करू शकाल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. अडकलेली महत्त्वाची कामे गती घेतील आणि ती पूर्ण करण्याचा मार्ग तयार होईल. विद्यार्थ्यांसाठीही काळ विशेषतः फलदायी ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
10 / 12
धनु: आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. दीर्घकालीन आजारही बऱ्याच प्रमाणात बरे होऊ शकतात. समाजात आदर वाढू शकतो. आर्किटेक्चर, इंटीरियर डिझाइन, डिझायनिंग किंवा रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढू शकते.
11 / 12
कुंभ: महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळू शकेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. नवीन योजनेवर काम करण्याच्या चांगल्या संधी मिळतील. येत्या काही दिवसांत त्याचा फायदा मिळू शकेल. प्रियकराकडून एक आश्चर्यकारक भेटवस्तू मिळू शकते. धार्मिक कार्यात अधिक रस असेल.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य