Learn the classical method of proper immersion of old photos and idols of gods!
देवांचे जुने फोटो, मूर्ती यांचे यथायोग्य विसर्जन करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 5:38 PM1 / 4जुने फोटो, भग्न मूर्ती वाहत्या पाण्यात सोडून देणे सर्वार्थाने उचित ठरते. कारण, त्या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. म्हणून साचलेल्या पाण्यात, डबक्यात अशा गोष्टी टाकू नये. तसेच अनेक लोकांना वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकण्याची सवय असते. मात्र, निर्माल्यामुळे पाणी दुषित होते. हारातील धागे दोरे पाण्यातील जीवांसाठी घातक ठरतात. निर्माल्य बागेतील झाडांना खत म्हणून पुनर्वापरात आणता येते. तसे केल्याने पाप लागत नाही, उलट पर्यावरणाचे संरक्षण होते. 2 / 4मातीच्या भग्न जुन्या मूर्ती जमीनित पुरल्यामुळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात. अशा मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यांवर श्रद्धेने हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक माती, दगड, वाळूपासून बनवलेल्या विकत घ्याव्यात. अशा मूर्ती विसर्जित करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीत किंवा समुद्रात सोडून न देता त्यांना जाळण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु तसे करतानाही श्रद्धापूर्वक मूर्तीला निरोप द्यावा.3 / 4कागदी फोटो किंवा शाडूच्य मूर्ती असतील तर त्या एका बादलीत पाणी भरून त्यात विरघळू द्या. त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावा. फोटो फ्रेम असतील, तर काळजीपूर्वक फोटो फ्रेममधून बाहेर काढून घ्या. फ्रेम तुटलेली असेल, तर ती टाकून देता येईल व फोटो पाण्यात विरघळून किंवा झाडाच्या मातीत मिसळता येईल. हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीत वापरता येईल. वाहत्या पाण्यात पोथी विसर्जित करता येईल. 4 / 4हा उपाय शास्त्राने सुचवलेला नसून, हा पर्याय आपणच आपल्या जबाबदारीने निवडला पाहिजे. देवीदेवतांच्या मूर्ती विकत घेताना किंवा भेट म्हणून मिळतात तेव्हा छान दिसतात, परंतु त्या जुन्या झाल्यावर, त्यांचे रंग उडू लागल्यावर त्या विद्रुप दिसू लागतात. म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक ती प्रदुषणमुक्त आहे की नाही, हे तपासून घ्यावे आणि मूर्ती दीड ते दोन इंचापेक्षा मोठी नाही, हे पहावे. मूर्तींची निर्मिती मुख्यत्वे मंदिरासाठी केली जाते. त्या शोभेची वस्तू नाहीत, याचे भान आणि मान आपणच ठेवला पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications