Love Life: If your future wife is of this zodiac sign, consider life as set!
Love Life: 'तुमची होणारी बायको 'या' राशीची असेल तर लाईफ सेट झालीच म्हणून समजा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 12:37 PM1 / 6आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे हे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की लोक एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात. अर्थात ते प्रेम म्हणावे की क्षणिक आकर्षण, हा निरिक्षणाचा विषय आहे. कारण ब्रेक अप, पॅच अप नाहीतर अन्य रिलेशनशिप या गोष्टींचा अगदी खेळखंडोबा झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येकाला गरज असते खऱ्या आणि निस्सीम प्रेम करणाऱ्या जोडीदाराची.2 / 6ज्योतिषशास्त्रात काही राशींचाउल्लेख आहे, त्या राशी आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात असे अभ्यासकांचे मत आहे. यावर तुमचा अनुभव काय, ते अवश्य सांगा. तूर्तास ज्योतिष शास्त्राचे भाकीत काय सांगते ते पाहू.3 / 6ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत स्वतःला झोकून देतात. ज्याच्याशी एकदा नाते जुळले, त्याच्यी आयुष्यभर साथ देतात. आपण जेवढे प्रेम करतो तेवढेच जोडीदाराने आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी त्या जोडीदाराचे मन रिझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे शेअरिंग करायला आवडते आणि तेवढीच पारदर्शकता जोडीदाराकडूनही अपेक्षित असते.4 / 6सिंह राशीच्या स्वभावाने कडक पण जोडीदाराच्या बाबतीत झुकते माप घेतात. आपाल्या आवडी निवडी सांगून त्या जोडीदाराकडून सगळ्या इच्छांची पूर्तता करून घेतात. त्यांना शिस्तबद्धता आवडते म्हणून काही वेळा त्या जोडीदाराशी कठोर शिक्षकासारख्या वागतात, पण त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराला त्याच्या आयुष्यात विशेषतः करिअर मध्ये खूप लाभ होतो. जोडीदाराशी त्यांचे अतूट नाते असते. त्या आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवतात आणि मिठीतही!5 / 6या राशीच्या मुली मनाने पारदर्शक असतात. त्या प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात. कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत व करून घेतही नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जो मुलगा या मुलींच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा, समाधान मानण्याचा, करिअरचा सर्वच बाबतीत दृष्टिकोन स्पष्ट असतो. त्यामुळे त्यांची स्थिर वृत्ती जोडीदाराला सुख दुःखात साथ आणि धीर देणारी ठरते. त्या आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या आवडी निवडीची काळजी घेतात. त्यांना संसार सुख चांगले मिळते.6 / 6मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची, आवडी-निवडीची चांगली काळजी घेतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या ठायी समर्पणाची भावना तीव्र असते. अनेक गोष्टी उशिरा मिळाल्याने त्यांच्या ठायी प्रचंड संयम बघायला मिळतो आणि हीच बाब त्यांना संसार सुखी करण्याचे बळ देतो. या राशीची जोडीदार तुमच्या वाट्याला आली असेल तर तुम्हीदेखील स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications