Lucky Girl : These zodiac sign girls enjoy like a queen at in laws house!
Lucky Girl: सासरी 'या' राशीच्या मुलींची चालते मनमानी; महाराणीसारखा करतात राजेशाही संसार! By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 1:04 PM1 / 6अर्थात अशी धीट वृत्ती स्वभावात असावी लागते. नाहीतर अनेक वाघिणींची शेळी होते. ज्योतिष शास्त्र सांगते, हा धीटपणा जन्मतः येतो तो राशीच्या गुणांमुळे. त्याच आधारावर ज्योतिष शास्त्राने अशा बिनधास्त वागणाऱ्या मुलींचे लग्नानंतरचे भाकीत वर्तवले आहे. तुमची किंवा तुमच्या मैत्रिणीची, बहिणीची, आईची किंवा तुमच्या बायकोची रास यापैकी एक असेल तर तुम्हीसुद्धा ही बाब मान्य कराल. चला तर पाहूया त्या राशी कोणत्या... 2 / 6या राशीच्या मुली सौंदर्यावर बरेच काही मिळवतात. त्यात जिभेवर साखर असेल तर विचारूच नका. सगळे जण आनंदाने त्यांच्या तालावर नाचणे पसंत करतात. या मुली हुशार, मनमिळावू असतात. शिवाय मनमौजी स्वभाव असल्याने त्या आपलं तेच खरं करण्यात पटाईत असतात. मात्र संवेदनशील स्वभावामुळे त्या कोणाला दुखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनमानीपणाला सासरी कोणीही विरोध करत नाहीत. 3 / 6या राशीच्या मुलींमध्ये जन्मतः करडेपणा असतो. प्रत्येक गोष्ट त्या नियमाच्या चौकटीत राहून करणे पसंत करतात. त्यामुळे त्या स्वतः चुकत नाहीत आणि घरच्यांना चुकू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संसाराची घडी अगदी शिस्तबद्ध असते. सासरच्या लोकांना त्यांच्या शिस्तीची सवय लागून तेही तिच्यासारखे वागू लागतात. त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या राशीच्या मुली ज्यांना जीव लावतात त्यांची काळजी वाहतात आणि त्यांच्यासाठी झटतात. त्यामुळे सासरी सर्वांच्या लाडक्या असतात. 4 / 6ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुली खूप मोकळ्या स्वभावाच्या मानल्या जातात. चारचौघात मिसळताना त्यांना कसली भीड नसते. त्यामुळे सासर असो नाहीतर माहेर त्या बिनधास्त वावरतात. लग्नाच्या बाबतीत त्या खूप भाग्यवान असतात. त्यांना पतीची पूर्ण साथ मिळते आणि सासरच्यांनाही त्या आपल्या स्वभावाने जिंकून घेतात. त्यामुळे त्यांना विरोध सहसा होत नाही आणि झाला तरी त्या जुमानत नाहीत. आपलेच खरे करतात आणि महाराणीसारख्या ऐषारामी जीवन जगतात. 5 / 6या मुली खूप हुशार असतात. कोणत्याही बाबतीत लोकांचे मत आपल्या बाजूने वाळवून घेण्यास त्यांना वेळ लागत नाही. त्यांना परावलंबी राहणे अजिबात आवडत नाही. त्या जे ठरवतात ते मिळवतात. त्यांचे असे वागणे सासरच्या मंडळींना खूप आवडते आणि त्यामुळेच त्या सासरी वर्चस्व गाजवतात. या मुली ज्या घरात जातात त्या घरातल्या लोकांना जिंकून घेतात. 6 / 6या राशीच्या मुलींचा स्वभाव इतर मुलींपेक्षा खूप वेगळा असतो. त्या स्पष्टवक्त्या असतात. आत बाहेर असा प्रकार त्यांना आवडत नाही. तसे करणाऱ्याला त्या फैलावर घेतात. त्या कामात चोख असतात. नावं ठेवायला लोकांना जागाच नसते. त्यामुळे सासरची मंडळी त्यांच्यावर खुश असतात. त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्यात मोठे पद भूषवतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व सासरच्यांसाठी अभिमानाची बाब असल्याने माहेरी असो वा सासरी त्यांचा प्रत्येक शब्द झेलला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications