1 / 12सन २०२१ मधील पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमेला लागणार आहे. यंदाच्या वर्षात एकूण चार ग्रहणे होणार असून, यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होणार आहे.2 / 12वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. 3 / 12जेव्हा पृथ्वी सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. जेव्हा चंद्र (पृथ्वीवरुन पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो, त्यावेळ खग्रास चंद्रग्रहण होते. २१ जानेवारी २०१९ रोजी खग्रास चंद्रग्रहण झाले होते.4 / 12वैशाख पौर्णिमेला होणारे खग्रास चंद्रग्रहण यंदाच्या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नाही. त्यामुळे केवळ ज्या भागांत चंद्रग्रहण दिसेल, त्या भागातच ग्रहणाचे नियम पाळावेत, असे सांगितले जात आहे. 5 / 12भारतात, २६ मे २०२१ रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. सायंकाळी चंद्रोदयावेळी पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, नागालँड, ओडिसा, मिजोरम, मणिपूर, आसाम, त्रिपुरा तसेच मेघालय या भागांमध्ये काही कालावधीसाठी चंद्रग्रहण दिसेल. (Lunar Eclipse 2021 Places In India)6 / 12या ठिकाणी चंद्रोदय होईल आणि काही मिनिटातच चंद्र दिसेनासा होईल. भारतातील अन्य कोणत्याही भागात हे चंद्रग्रहण दिसणार नाही, असे सांगितले जाते. (Lunar Eclipse 2021 Date and Time)7 / 12चंद्रग्रहणाचे वेध पहाटे ६ वाजून १५ मिनिटांनी सुरू होतील. चंद्रग्रहणाचा स्पर्श दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी होईल. चंद्रग्रहणाचा मध्य सायंकाळी १६ वाजून ४९ मिनिटांनी असेल, तर चंद्रग्रहण मोक्ष सायंकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी होईल.8 / 12भारतासह दक्षिण पूर्व आशियाचा काही भाग, जपान, इंडोनेशिया, बांगलादेश, सिंगापूर, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण दिसेल.9 / 12चंद्रग्रहणापूर्वी किंवा त्यानंतर केलेले दान अधिक लाभदायक असल्याची धर्मशास्त्रांत मान्यता आहे. चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद लाभतात, असे मानले जाते. चंद्रग्रहणात चांदी दान करण्यास प्रचंड महत्त्व आहे.10 / 12चंद्रग्रहण ज्या ठिकाणी दिसेल, त्याच ठिकाणी केवळ ग्रहणाचे धार्मिक नियम पाळावेत, असे सांगितले जात आहे. मात्र, भारतातील अन्य भागात नियमित पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये केली, तरी चालतील, असे सांगितले जात आहे. 11 / 12यावर्षी एकूण ४ ग्रहण होतील. यापैकी २ सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. पहिले सूर्य ग्रहण १० जूनला आणि दुसरे ४ डिसेंबर रोजी लागणार आहे. तसेच पहिले चंद्रग्रहण २६ मे आणि दुसरे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला लागेल.12 / 12सन २०२१ मध्ये १० जून रोजी लागणारे सूर्यग्रहण भारताच्या काहीच भागात दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. तर, ०४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावास्येला सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, असे सांगितले जात आहे.