शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandra Grahan 2023 Numerology: ‘या’ ४ मूलांकांना चंद्रग्रहण लाभदायी, करिअर-नोकरीत प्रगती; सुखाचा काळ, पौर्णिमा शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 12:03 PM

1 / 12
मे महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे ०५ मे २०२३ रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्धपौर्णिमेला हे चंद्रग्रहण लागणार आहे. यंदाचे हे पहिले चंद्रग्रहण आहे. ०५ मे रोजी रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार आहे. तर रात्रौ १० वाजून २३ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तसेच मध्यरात्रौ ०१ वाजून ०२ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. (lunar eclipse may 2023 numerology)
2 / 12
चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील आहे. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. ग्रहणाचे वेधादि नियमही पाळू नये, असे सांगितले जाते. हे चंद्रग्रहण तूळ रास आणि स्वाती नक्षत्रात लागणार आहे. या ग्रहणात पौर्णिमेचे तेजस्वी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेत आल्याने कमी तेजस्वी झालेले दिसते.
3 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. चंद्रग्रहणाला गुरु, सूर्य, बुध, राहु हे ग्रह मेष राशीत विराजमान असतील. तर मंगळ आणि शुक्र हे ग्रह मिथुन राशीत असतील. केतु तूळ राशीत असेल. शनी कुंभ राशीत असेल. चंद्रग्रहणाला ग्रहांच्या असलेल्या स्थितीचा अंकशास्त्रातील मूलांकांवरही प्रभाव पडेल, असे म्हटले जात आहे. याचा काही मूलांकांना उत्तम लाभ मिळू शकेल. जाणून घ्या...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी अचानक बदल घडू शकतील. कामाच्या ठिकाणी काही निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. आर्थिक बाबींचा विचार करता, पैसे मिळतील. परंतु ते तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात. जीवनात थोडे प्रतिबंधित वाटू शकते.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. आदर वाढेल. अनेक बाबतीत यश मिळवू शकाल. कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. आर्थिक खर्च जास्त असू शकतो. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप त्रासदायक ठरू शकतो.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. कामे योग्य पद्धतीने हाताळण्यास सक्षम असाल. जितके त्वरित निर्णय घ्याल, तितके अधिक फायदे मिळू शकतील. जीवनात आनंद मिळू शकेल. आता करत असलेले कष्ट भविष्यात शुभ फळ देऊ शकतील.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने काम कराल. यश मिळू शकेल. जोडीदाराशी विचारपूर्वक संभाषण करावे लागेल. आर्थिक बाबतीत विचार करुन मगच गुंतवणूक करावी. तर चांगले परिणाम मिळू शकतील. जीवनात आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होऊ शकतील. प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवाल. आर्थिक बाबींसाठी हा काळ शुभ असून, गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्रात आळस सोडून पुढे जा. कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. भविष्यासाठी सर्वोत्तम संधी मिळू शकतील. भविष्यासाठी योजना करणे फायदेशीर ठरेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. सर्व निर्णय मोठ्या संयमाने घ्यावे लागतील, तरच तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकेल. खर्चही वाढू शकेल. मोठी गुंतवणूक टाळणे हिताचे ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला तरच यश मिळू शकेल.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळ फायदेशीर सिद्ध होईल. प्रगतीच्या संधी मिळू शकतील. एखादे नवीन काम शुभ परिणाम देणारे ठरू शकेल. आर्थिक बाबतीत हा कालावधी चांगला राहू शकेल. धनाच्या आगमनाचे चांगले योगायोग होतील. एखाद्या गोष्टीबद्दल मन निराश होऊ शकते.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नशिबाची साथ मिळू शकेल. परस्पर प्रेम मजबूत होईल. धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत अधिक प्रयत्न करावे लागतील. कार्यक्षेत्रात अहंकारामुळे संघर्ष वाढू शकेल. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कालांतराने शुभ परिणाम दिसून येऊ शकतील.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कार्यक्षेत्रात कोणताही बदल घडून येऊ शकतील. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होऊ शकेल. आपले मत स्पष्टपणे व्यक्त केल्यास शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणnumerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष