lunar eclipse november 2021 effect of chandra grahan on kartik purnima over all zodiac signs
Lunar Eclipse 2021: सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना भरघोस लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 9:05 PM1 / 12सन २०२१ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण खंडग्रास स्वरुपातील असणार आहे. (Lunar Eclipse 2021)2 / 12गेल्या काही शतकांतील हे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सुमारे ५८० वर्षांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते. त्यानंतर आता १९ नोव्हेंबर २०२१ रोजी असे चंद्रग्रहण आहे. तसेच यानंतर ८ फेब्रुवारी २६६९ रोजी असे चंद्रग्रहम होईल, असे सांगितले जात आहे. (Lunar Eclipse 2021 Astrology)3 / 12कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण आंशिक स्वरुपातील असले तरी त्याचा कालावधी तब्बल ३ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंदाचा असणार आहे. हे चंद्रग्रहण साधारणपणे सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपेल, असे सांगितले जात आहे. हे चंद्रग्रहण भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेशमधील काही भागांमध्ये पाहता येऊ शकेल. (Chandra Grahan November 2021)4 / 12वृषभ राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत सावधगिरी बाळगावी, असे सांगितले जात आहे. कार्तिकी पौर्णिमेला होत असलेले या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीतच होत आहे. यामुळे काही मानसिक समस्या उद्भवू शकतात. यासाठी ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 5 / 12कन्या राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत कोणतीही गुंतवणूक करणे शक्यतो टाळावे. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. आई-वडिलांसोबत चर्चा करताना शब्दांचा वापर जपून करावा. शिवाची उपासना करणे शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 6 / 12तुळ राशीच्या अष्टम भावमध्ये हे चंद्रग्रहण लागत असून, या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. ध्यानधारणा, योग करणे फायदेशीर ठरू शकेल. आध्यात्मिक आवड वाढेल. 7 / 12वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी व्यापार, उद्योग, व्यवसायात होणारे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा तोटा सहन करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवनात छोट्या छोट्या कुरबुरी होऊ शकतात. मात्र, वादविवाद टाळावेत. प्रतिक्रिया देणे टाळावे, असे सांगितले जात आहे. 8 / 12धनु राशीच्या व्यक्तींना अनामिक भीती ग्रासू शकते. मनाची चंचलता दूर करण्यासाठी प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे. आपल्या हितशत्रू, विरोधकांपासून सावध राहावे. चंद्रग्रहणात काही दान केल्यास शुभ फलांची प्राप्ती होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. 9 / 12मकर राशीच्या व्यक्तींनी कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगला व्यवहार ठेवावा. वादविवाद टाळावेत. अन्यथा मतभेद, गैरसमज होऊ शकतात. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश न मिळाल्याने मानसिक ताण वाढू शकतो. तसेच प्रेमात असलेल्यांनी जोडीदाराशी वाद घालू नयेत, असे सांगितले जात आहे. 10 / 12मीन राशीच्या तृतीय भावात हे चंद्रग्रहण होत आहे. या राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. अनामिक भीती वाटू शकते. आपल्या मताची किंमत न ठेवणाऱ्यांशी संवाद वाढवू नये. अन्यथा अपमान होऊ शकतो. शब्द वापरताना भान ठेवा. भावंडांशी बोलताना तोल ढळू देऊ नका, असे सांगितेल जात आहे. 11 / 12दुसरीकडे, मेष, मिथुन, कर्क, सिंह, कुंभ या राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण सकारात्मक राहील. शुभवार्ता मिळतील. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. (Chandra Grahan on Kartik Purnima 2021)12 / 12चंद्रग्रहणाच्या कुंडलीनुसार, जलतत्वाची मीन राशीत लग्न उदय होत आहे आणि सूर्य आणि चंद्र दोन्ही जलतत्वाच्या राशीत नवांशात स्थित असतील. या ग्रहणावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान असेल. आताच्या घडीला राहुदेखील वृषभ राशीत आहे. हे चंद्रग्रहण कृतिका नक्षत्रात होत आहे. (Lunar Eclipse November 2021) आणखी वाचा Subscribe to Notifications