Maha Shivratri 2023: Know General Rules To Be Followed During Shiv Pooja!
Maha Shivratri 2023: शिवपूजा करताना सर्वसामान्यपणे कोणते नियम पाळले जावेत, हे जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 2:36 PM1 / 7>>घरामध्ये दोन शिवलिंगाची पूजा करू नये. 2 / 7>>भस्मधारण केल्याखेरीज शिवपूजेस आरंभ करू नये. तसेच शिवपूजा करताना गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि शुभ्र वस्त्र अवश्य परिधान करावे. 3 / 7>>शिवपूजेत अभिषेकाच्या वेळी शिवास शंखोदकाने म्हणजे शंखातील पाण्याने स्नान घालू नये. 4 / 7>>मंदिरातील शिवलिंगास शिव निर्माल्यापर्यंतच प्रदक्षिणा घालावी. घरातील शिवपूजेच्या वेळी स्वत: भोवती प्रदक्षिणा करावी.5 / 7>>शिवास केवडा व तुळस वाहू नये. परंतु विष्णुचरणवरील तुळस शिवाला प्रिय आहे. तसेच बेल, कुंद, कोरांटी व पांढरी कण्हेर शिवाला अत्यंतर प्रिय आहे. शिवपिंडीवर बेलाचे त्रिदल किंवा पंचदल अग्र आपणाकडे उपडे वाहावे.6 / 7>>मंदिरातील नंदीच्या वृषणावर डावा हात आणि शिंगांवर उजव्या हाताची तर्जनी व अंगठा ठेवून त्यातून शिवदर्शन घ्यावे.7 / 7उपरोक्त नियमांचे पालन करताना मनोमन भक्ती आणि आवड ठेवून पूजा करावी. भोळा सांबसदाशिव भक्ताची सेवा आनंदाने मान्य करून घेतो. आणखी वाचा Subscribe to Notifications