Maha Shivratri 2023: इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीपासून सुरू करा बिल्वपत्राचे 'हे' साधे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 12:03 IST
1 / 7शिवपुराणात शिव पूजेसंबंधित अनेक नियम दिले आहेत. त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बिल्वपत्र अर्थात बेल पत्र. भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. बेलपत्राला त्रिदल असेही म्हणतात. कारण त्याला तीन पाने असतात. त्यातील एक पान नसेल तरी ते बेल पत्र अपूर्ण मानले जाते. 2 / 7तुम्हाला माहित आहे का की पाच पानांचेदेखील बेलपत्र असते. ही बेलपत्रे फार दुर्मिळ असतात. शिवपूजेत याला विशेष स्थान आहे. हे सहजासहजी मिळत नाही, मात्र ज्यांना ते मिळते आणि ज्यांच्याकडून शिवाला ते अर्पण केले जाते, त्यांना विशेष शिवकृपा प्राप्त होते असे म्हणतात. परंतु, आपल्या राहत्या ठिकाणी ते पंचदल उपलब्ध होणे अवघड आहे, म्हणून जे त्रिदल उपलब्ध असते, ते अर्पण करताना पुढील नियम कटाक्षाने पाळा आणि त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या. 3 / 7शिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान केल्यावर देवघरातल्या महादेवाला किंवा मंदिरातल्या महादेवाला आठवणीने बेल वहावा. बेल वाहून झाल्यावर मनातल्या मनात महादेवासमोर आपली इच्छा प्रगट करावी. हा उपाय किमान ११ सोमवार करावा. यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. 4 / 7विवाह ठरण्यात किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्यास शिवपूजेचा उपाय करावा. त्यामुळे शिव पार्वती सारखे तुमचेही नाते दृढ होईल. यासाठी शिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. ओम नमः शिवाय हा जप करत १०८ बेलपत्र अर्पण करा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील. 5 / 7जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्री[पासून सलग काही दिवस १०८ बेलपत्र ओम नमः शिवाय चा जप करत शिवलिंगावर अर्पण करा. तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारींपासून मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे ज्यांना सुदृढ आरोग्य हवे आहे, त्यांनीदेखील उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवाची उपासना करा आणि रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंताचा आदर्श ठेवून मेहनतीने शरीर कमवा. 6 / 7संतान सुख हवे असेल तर दर सोमवारी श्रद्धेने शंकराची पूजा करा. ही पूजा जोडीने करणे जास्त योग्य ठरेल. दोघांनी मिळून शिवमंदिरात जा, शंकराचे दर्शन घ्या आणि पिंडीवर दूध अर्पण करण्याआधी बिल्वपित्र त्या दुधात बुडवून अर्पण करा आणि नंतर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा. शिवरात्रीपासून हा उपाय सुरु करा, लवकरच लाभ होईल. 7 / 7जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा उत्पन्नात वाढ होत नाही असे वाटत असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्राची ५ पाने अर्पण करा आणि एक पान तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवा. या शिवप्रसादामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. शिव शंकराचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील.