शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:22 AM

1 / 15
नोव्हेंबर महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. यामध्ये नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध आणि शुक्र यांचा समावेश आहे. तर नवग्रहांचा सेनापती मंगळ वक्री होणार असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पति मार्गी होणार आहे. याशिवाय वृश्चिक राशीत तीन ग्रहांचा महासंयोग जुळून येत असून, त्रिग्रही शुभ योग तयार होत आहे. (trigraha yoga in scorpio 2022)
2 / 15
शुक्र ग्रह ११ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहेत. यानंतर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध १३ नोव्हेंबर रोजी प्रवेश करत आहे. तर १६ नोव्हेंबरला नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे वृश्चिक राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. (trigrahi yoga in vrischika rashi 2022)
3 / 15
त्रिग्रही योगासह अष्टलक्ष्मी योग, बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग असेही योग जुळून येत आहे. हे योग सूर्य, बुध, शुक्र या तीन ग्रहांमुळे तयार होतात, असे सांगितले जाते. या शुभ योगांचा तीन राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत, त्या तीन राशी, जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योगाचा शुभ प्रभाव दिसू शकेल. व्यापारी वर्ग व्यवसायाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू शकतील. उत्पन्नाचे विविध स्त्रोत मिळतील. वैवाहिक जीवनात वैयक्‍तिक पातळीवर तणाव आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल. व्यावसायिकांना केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचा खर्च वाढू शकतो. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. कायदेशीर प्रकरणांमधून आर्थिक दिलासा मिळू शकेल. या काळात डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. लोकप्रियतेत वाढ होऊ शकेल. पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या विस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. सरकारी क्षेत्र करिअरसाठी फायदेशीर ठरेल. कर्जाची परतफेड करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतील.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग सकारात्मक ठरू शकेल. वरिष्ठांशी असलेले संबंध लाभदायक ठरतील. नवीन प्रकल्प फायदेशीर ठरू शकेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. यश, प्रगतीचे मार्ग मिळू शकतील. मेहनतीचे फळ मिळू शकेल. नवीन लोकांच्या ओळखी व्यवसायात लाभदायक ठरू शकतील. तुमच्या प्रयत्नांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. जुनी देणी किंवा थकबाकी वसूल करण्यासाठी वेळ शुभ राहील. निर्यातीतून व्यावसायिकांना नफा मिळेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग संमिश्र ठरू शकेल. रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल येऊ शकेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. समाधान मिळेल. व्यावसायिकांना नवीन कर्ज मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करण्यास सक्षम असतील. मुलांच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल. वैयक्तिक जीवनात नवीन ऊर्जा प्रवाहित होईल. नातेसंबंधांमध्ये फायदेशीर परिणाम होतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकेल. नोकरीत पद आणि अधिकारात वाढ होऊ शकते. व्यवसायात भागीदाराशी मतभेद टाळावेत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. अहंकार टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. तुमची मुले विलासी जीवन जगू शकतात.
11 / 15
वृश्चिक राशीत शुक्र, बुध, सूर्य ग्रहांचा त्रिग्रही महासंयोग जुळून येत आहे. याचा या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. अनियोजित खर्च आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना अनुकूल परिणाम मिळतील. ऑफिसमध्ये बॉससोबत गैरसमज वाढू शकतात. तुम्हाला शांत राहण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशात नाव, सन्मान आणि यश मिळेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल. तुमचे उत्पन्न वाढत राहील. व्यवसायात फायदा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क मजबूत होईल. जीवनात पुढे जाण्यास मदत होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. सरकारकडून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. भावंडांचे सहकार्य कायम राहील.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग उत्तम ठरू शकेल. व्यवसायात वाढीचे नवीन मार्ग दिसतील. वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक व्यवसायातून लाभाचे संकेत आहेत. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता मजबूत होईल. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. सरकारी क्षेत्रातून लाभ होण्याची चिन्हे आहेत. काहीजण नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतात. कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत कमी वेळ घालवायला मिळेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग चांगला ठरू शकेल. लोकप्रियता वाढेल. निर्णय घेण्याचे कौशल्य करिअरच्या वाढीस मदत करेल. कठोर परिश्रमाच्या जोरावर लक्षणीय नफा मिळवू शकाल. नोकरी बदलाची योजना पूर्ण होईल. व्यावसायिकांना जोखीम पत्करून फायदा होईल. आपल्या वडिलांशी सौहार्दपूर्ण आणि विनयशील राहा अन्यथा कौटुंबिक नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबतचे नाते घट्ट करण्याची गरज आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग संमिश्र ठरू शकेल. नवीन उपक्रमात गुंतवणूक करणे टाळा. प्रवासामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात, शिक्षक, मार्गदर्शक आणि वडील तुम्हाला स्नेह आणि समर्थन प्रदान करतील. ते तुमच्यासाठी आनंदाचे स्रोत असेल. सासरच्या घरात शुभ सोहळा साजरा करता येईल. तुमची सर्जनशील प्रवृत्ती वाढेल आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यास इच्छुक असाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य