शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३०० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग: ६ राशींना शुभ; शनी-मंगळाची होईल कृपा, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 11:27 AM

1 / 10
०८ मार्च रोजी देशभरात महाशिवरात्रीचे महापर्व साजरे केले जाणार आहे. महादेवांच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्येही महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास यंदाची महाशिवरात्री अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जुळून येत आहे.
2 / 10
श्रवण नक्षत्राचा स्वामी शनी ग्रह आहे. महादेव हे शनीचे गुरु आहेत. महादेवांनीच शनीला नवग्रहांचा न्यायाधीश केल्याची मान्यता आहे. श्रवण नक्षत्रात शनीचे आराध्य असलेल्या महादेवांचे पूजन शुभ मानले जात असून, शनीची विशेष कृपा मिळू शकते, असे सांगितले जात आहे. तसेच धनिष्ठा नक्षत्रही असणार आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ ग्रह आहे. धनिष्ठा नक्षत्रातील शिवपूजनामुळे मंगळ ग्रहाच्या शुभाशिर्वादामुळे आगामी काळ मंगलमय ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
3 / 10
महाशिवरात्रीला कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग तयार होईल. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत बुध आणि राहुचा युती योग जुळून येईल. मंगळ मकर राशीत असेल. काही मान्यतांनुसार, असा अद्भुत योगायोग सुमारे ३०० वर्षांनंतर घडणार आहे. महाशिवरात्रीचे अद्भूत शुभमहापर्व नेमक्या कोणत्या राशींसाठी वरदान काळाप्रमाणे ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. पैशांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे यशस्वी होतील.
5 / 10
वृषभ: जमीन किंवा वाहन खरेदी शक्य होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे सुरू होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भौतिक सुखाचा लाभ घेऊ शकाल. कामात अपेक्षित यश मिळेल. दागिन्यांची खरेदी करू शकाल. हातून एखादे मोठे कार्य घडू शकेल.
6 / 10
कन्या: कामाचे सकारात्मक परिणाम होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. संपत्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.
7 / 10
तूळ: नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. अनेक स्त्रोतांमधून उत्पन्न मिळेल. दीर्घ काळापासून परदेशात जाऊन पैसे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकतात.
8 / 10
मकर: कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरदारांना ऑफिसमध्ये बढती मिळू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मानसिक ताण कमी होईल. नवीन नोकरीची चांगली संधी मिळू शकेल. पद-प्रतिष्ठा वाढेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल.
9 / 10
कुंभ: जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जमीन किंवा वाहन खरेदी शक्य आहे. कुटुंबात सुख, शांतता नांदेल. व्यवसायात स्थिती मजबूत होऊ शकेल. नवीन योजना कार्यान्वित होऊ शकतील. करिअरमध्ये यश-प्रगतीची संधी मिळू शकेल. नफा कमावू शकाल. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतील.
10 / 10
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषMahashivratriमहाशिवरात्रीZodiac Signराशी भविष्य