शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makar Sankranti 2023: मकर संक्रांती: ‘या’ ५ राशींनी करावे विशेष उपाय, शनीकृपा लाभेल; प्रतिकूल प्रभाव पडणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:45 AM

1 / 11
नवीन वर्ष २०२३ मधील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. देशभरात मकर संक्रांती उत्साहात साजरी केली जाते. देशातील विविध ठिकाणी मकर संक्रांती साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही मकर संक्रांतीचे महत्त्व विशेष आहे. (Makar Sankranti 2023)
2 / 11
यंदाच्या वर्षी १५ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला १४ जानेवारी रोजी नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणालाच मकर संक्रांती म्हटले जाते. तसेच १७ जानेवारी २०२३ रोजी शनी स्वराशीतून आपले स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (shani gochar 2023)
3 / 11
सुमारे ३० वर्षांनंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत शनीचे संक्रमण असल्याने ५ राशींवर शनीचा प्रतिकूल प्रभाव पडू लागेल. या संक्रमणानंतर ३ राशींवर साडेसातीचा आणि २ राशींवर शनी ढिय्या प्रभाव असेल. तर मिथुन राशीची शनीच्या ढिय्या प्रभावातून मुक्तता होईल. (shani sade sati upay)
4 / 11
शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यावर या ५ राशींवर काय परिणाम होईल. यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी या राशींनी काही उपाय करावेत जेणेकरून शनीच्या या संक्रमणाचा प्रतिकूल प्रभावाचा त्रास अधिक जाणवणार नाही, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी घ्यावी आणइ कोणते उपाय करावेत? जाणून घेऊया...
5 / 11
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीच्या ढिय्या प्रभावातून मुक्ती मिळेल. मात्र, तुम्हाला तुमच्या कामात अडथळे आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मन विचलित होऊ शकेल. नियमित उत्पन्न मिळत राहील, पण, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जमीन, घर, मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडे सावध राहण्याची गरज आहे. या राशीच्या व्यक्तींनी शनीचे नीलम रत्न धारण करावे. मात्र, त्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा.
6 / 11
कर्क राशीच्या व्यक्तींवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. हा काळ फारसा फलदायी नाही. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली राहू शकता. कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांचाही सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत खूप सावध राहण्याची गरज आहे. विचारपूर्वक पैसे गुंतवा. बजेट लक्षात घेऊन खर्च करा. मकर संक्रांतीला आणि शक्य असल्या पुढे दररोज शनी मंत्रांचा नियमित जप करावा.
7 / 11
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. हा काळ फारसा अनुकूल नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. आहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात कोणत्याही बाबतीत अशांततेचे वातावरण असू शकते. आर्थिक आघाडीवर, नियमित स्त्रोतांकडून उत्पन्न मिळविण्यात अडथळे येऊ शकतात. मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा वाद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे शनिवारी आणि मंगळवारी हनुमान पूजा करावी आणि सुंदरकांड पठण करावे. पठण करणे शक्य नसल्यास श्रवण करावे.
8 / 11
मकर राशीच्या व्यक्तींचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असून, शनीच्या कुंभ प्रवेशानंतर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. आपल्या मान-सन्मानाबाबत खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.किरकोळ आरोग्य समस्या येत राहतील. कुटुंबात पूर्वीच्या तुलनेत शांतता राहील. परंतु, नेहमी एका किंवा दुसर्‍या गोष्टीवरून संघर्ष असेल. नोकरदारांसाठी काळ फलदायी राहील. कोणतेही काम निष्काळजीपणाने न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सातमुखी रुद्राक्ष धारण करावे. मात्र, त्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा.
9 / 11
कुंभ राशीच्या व्यक्तींचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनीच्या या राशीतील आगमनानंतर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त व्हाल. घरगुती आणि करिअरशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार नाही. आर्थिक स्थितीवरही मोठा परिणाम होईल. खर्चात वाढ होईल. व्यवहार करताना विशेष सावध राहण्याची गरज आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनातही विनाकारण त्रास होऊ शकतो. दररोज महादेव शिवशंकर आणि हनुमान पूजा करावी. शनिवारी सुंदरकांड पठण केल्यास लाभ होईल.
10 / 11
मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. शनीच्या कुंभ प्रवेशाने मीन राशीची साडेसाती सुरू होईल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. व्यर्थ प्रवासही करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. नोकरदारांसाठी हा काळ खूप त्रासदायक ठरेल. बदली होऊ शकते. व्यापारी वर्गातील लोकांना कामाचा फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर, तो काही काळासाठी पुढे ढकलणे चांगले. या राशीच्या व्यक्तींना पिंपळाच्या झाडाच्या मूळाशी जलार्पण करावे. शनिवारी तेलाचा दिवा लावावा.
11 / 11
शनी धनिष्ठ नक्षत्रात, कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील शनीचे संक्रमण ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल घडवून आणेल, ज्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यMakar Sankrantiमकर संक्रांती