शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makarsankranti 2021: २०२१ ची मकरसंक्रात महापुण्यदायी ठरणार आहे; कशी, ते जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 08, 2021 8:00 AM

1 / 5
यावर्षी मकर संक्रांतीला सूर्याबरोबर चंद्र, शनि, बुध, गुरु हे ग्रहदेखील मकर राशीत असणार आहेत. म्हणून तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे, की यंदाची मकर संक्रांत अधिक लाभदायी ठरणार आहे.
2 / 5
१४ जानेवारी दुपारी २ वाजून ५ मीनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. शास्त्रानुसार उत्तरायणाचा अवधि देवतांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवतांच्या शयनाची वेळ यावर अवलंबून असतो.
3 / 5
मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवसापासून पुढे वर्षभर सूर्याला अर्घ्य देत, सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार सुरू केल्यास सुदृढ आरोग्य लाभते. तसेच संक्रांतीचा काळ थंडीचा असल्यामुळे गोरगरीबांना अन्न, वस्त्र दान करणे उचित ठरते. नात्यांमधील वितुष्ट दूर करण्यासाठी तिळगुळाचे वाण देऊन हितशत्रूंपासूनही मुक्तता करता येते.
4 / 5
भारतात विविध ठिकाणी विविध पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते. तामिळनाडुत ताइ पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, हरयाणा, हिमाचल प्रदेशमध्ये माघी, आसाममध्ये भोगाली बिहु, कश्मीरी घाटीत शिशुर संक्रांत, पश्चिम बंगाल मध्ये पौष संक्रांती, कर्नाटकमध्ये मकर संक्रमण, पंजाब मध्ये लोहडी आणि उर्वरित राज्यांमध्ये मकर संक्रांती या नावाने ती साजरी केली जाते.
5 / 5
यंदा संक्रांत श्वेत वस्त्र परिधान करून सिंहावर आरूढ होऊन येणार आहे. त्यामुळे चांदी, तांदूळ, दूध, साखर यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष कष्टकरी वर्गाचा संयम पाहणारे असले, तरीदेखील त्यांना वर्षाअखेर कष्टाचे सुमधूर फळ मिळेल. बाजूच्या देशांशी वैर, तर पश्चिमी देशांशी मैत्री होण्याची शक्यता आहे. तसेच महामारीचे सावटही दूर होईल, असे म्हटले जात आहे.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती