Mana, the last village in India from which the Pandavas ascended to heaven; Everyone must go here!
पांडव जिथून स्वर्गस्थ झाले ते भारतातले शेवटचे गाव 'माणा'; इथे प्रत्येकाने गेलेच पाहिजे! By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:37 AM1 / 5माणा या गावाचे पौराणिक नाव मणिभद्र असे आहे. इथे अलकनंदा आणि सरस्वती नदीचा संगम पाहायला मिळतो. 2 / 5माणा येथे सरस्वती नदीवर भीम पूल आहे. त्याचे नाव असे असण्यामागेही पौराणिक कथा अशी आहे की, पांडवांनी स्वर्गाच्या दिशेने प्रयाण करत असताना वाटेत आलेल्या सरस्वती नदीला वाट करून देण्याची विनंती केली. परंतु तिने ती विनंती अमान्य केल्यामुळे भीमाने दोन मोठ्या अचाट शिळा त्या नदीवर टाकल्या आणि भीम पूल बांधला गेला. आजही भीम पूल अजून भक्कम स्थितीत आहे. 3 / 5गणपती बाप्पा जेव्हा तिथे वेद लिहायला बसले तेव्हा सरस्वती नदीचा उसळता प्रवाह आणि त्याचा खळखळाट ऐकून बाप्पाने नदीला आवाज कमी करण्याची विनंती केली. सरस्वती नदीने ती विनंतीदेखील अमान्य केली. तेव्हा बाप्पाने रागाच्या भरात शाप दिला, की इथून पुढे तू कोणालाच दिसणार नाही. त्यामुळे सरस्वती नदीचा तिथे शेवट होऊन ती अलकनंदा नदीत मिसळून लोप पावते. 4 / 5तिथे एक व्यासांचे मंदिर आहे. असे म्हणतात की ते मंदिर आज जिथे स्थित आहे, त्याच जागेवर बसून महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि लेखनिक झालेल्या गणपती बाप्पाने तिथे बसून महाभारत लिहून काढले. 5 / 5तिथे वसुधारा नावाचा एक धबधबा आहे. तो ४०० फूट उंचावरून कोसळतो. त्याचे दुधाळ, फेसाळ पाणी खाली येताना पाहणे म्हणजे जणू शुभ्र मोत्यांची लड अंगावर घेण्यासारखे आहे. या धबधब्याबाबत एक समज आहे, की पापी माणसाच्या अंगावर ते पवित्र पाणी पडत नाही. त्यामुळे आपण पुण्यवान आहोत की पापी याची शाहनिशा करण्यासाठी का होईना भारताच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या गावी एकदातरी भेट दिलीच पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications