शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mangal Rashi Parivartan 2022 April: मंगळाचा कुंभ प्रवेश: कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ अन् कुणी सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:03 PM

1 / 13
मंगळ या ग्रहानं कुंभ राशीत गोचर केलं आहे. या राशीत मंगळ १७ मे पर्यंत विराजमान असणार आहे. मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा ऊर्जा, भावंड, जमीन, सामर्थ्य, धैर्य, आणि पराक्रमाचा कारक ग्रह आहे असं म्हटलं जातं. मंगळाचं गोचर काही राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवून देईल. पाहूया यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा आणि कोणाला हानी.
2 / 13
मेष: तुमचा वेळ चांगला जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्या पदोन्नतीचीही शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ असून त्यात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. मालमत्तेतून उत्पन्नात वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवन देखील आनंददायी असेल. मोठी भावंडे मदत करू शकतात.
3 / 13
वृषभ: तुम्ही कोणत्या गोष्टीत सर्वोत्तम आहात हे जगाला दाखवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मान मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगले काम कराल आणि तुम्ही हुशारीने गुंतवणूक कराल. आपण आपल्या वैयक्तिक संबंधांमध्ये थोडे अधिक संयम आणि विनम्र असणे आवश्यक आहे.
4 / 13
मिथुन: तुमच्या आर्थिक समस्यांचे निराकरण होईल आणि उत्पन्न वाढेल. रिअल इस्टेट या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचू शकते. कुटुंबीयांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल.
5 / 13
कर्क: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वागताना तुम्हाला निराशा येऊ शकते. कार्यालयात प्रोत्साहनाचा अभाव राहील. जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मनात आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहात अशी भावना येऊ शकेल. तुमच्या गुंतवणूकीच्या योजना पुढे ढकला.
6 / 13
सिंह: व्यवसाय किंवा भागीदारीमध्ये असलेल्या व्यक्तींना फायदा होईल आणि जे नोकरी करत आहेत त्यांना वेतनवाढीच्या वार्ताही समजतील. सध्या तुम्हाला धीर धरावा लागेल. तुमच्या सहकार्‍यांशी वाद घालणे टाळा. गुंतवणुकीमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जोडीदाराचे वर्तन थोडे अनपेक्षित असू शकते.
7 / 13
कन्या: परिस्थीती कशीही असली तरी तुम्ही त्यासमोर खंबीरपणे उभे राहाला. तुमच्या कामाप्रती समर्पण पाहून तुमचे वरिष्ठही खुश होतील. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला धीर धरावा लागेल आणि भविष्यात नफा मिळण्याची वाट पहावी लागेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक गोष्टी घडू शकतील. तुमच्या जोडीदाराला आरोग्याची समस्या उद्भवू शकते.
8 / 13
तूळ : तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार दिसू शकतात आणि तुमच्यापैकी काही जणांच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. छुप्या शत्रूंपासून सावध राहत तुमच्या कामातही सावध राहण्याची गरज आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पण कर्ज घेतलं असेल तर फेडण्यात त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नवीन नातेसंबंध जोडताना सावधगिरी बाळगा.
9 / 13
वृश्चिक: तुम्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्हाला मित्र तसंच कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या आक्रमकतेमुळे तुमचे इतरांशी असलेले नाते खराब होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ सामान्य स्वरुपाचा असेल. त्यामुळे शेअर्स किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकेल. परंतु तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल.
10 / 13
धनु : या काळात तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाचा विस्तार करण्याच्या स्थितीत असाल. यावेळी प्रवास करणे फायदेशीर ठरेल, विशेषतः प्रवास करिअरशी संबंधित असेल. गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळाल्यानं आर्थिक फायदा संभवतो. वैयक्तिक जीवन चांगले राहील. कौटुंबिक कार्यक्रम साजरे कराल.
11 / 13
मकर : कुटुंबात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी वा घटनांमुळे चिडचिड होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येऊ शकते. सखोल अभ्यास करुन गुंतवणूकीचा विचार केल्यास धनलाभ होऊ शकतो. घाईत वाहन चालवणं टाळा.
12 / 13
कुंभ : अचानक तुमची चिडचिड होऊ शकते. तुम्ही कार्यक्षेत्रात प्रगती कराल. ठरवलेलं काम वेळेच्या पूर्वीच पूर्ण कराल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा आणि कोणताही नवीन उद्योग सुरू करणं टाळा. या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि वैयक्तिक सुसंवादासाठी संयम राखा.
13 / 13
मीन: तुमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुम्हाला तणावाखाली आणण्यासाठी आणि हानी पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू शकतात. या काळात तुम्ही चिडचिड होऊ शकते. आर्थिक जबाबदाऱ्या आणि आव्हानांसाठी तयार रहावं लागू शकतं. कौटुंबिक जिवनात वाद होऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक संबंधांवर समाधानी नसाल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष