शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळाचा चंद्रराशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना मंगलमय, लाभदायक योग; इच्छापूर्तीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 1:22 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह १० मे रोजी बुधाच्या मिथुन राशीतून चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करत आहे. मंगळ हा अग्नितत्त्वाचा ग्रह असून, मंगळाचा कर्क प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. (mangal gochar in kark rashi 2023)
2 / 9
मंगळाच्या कर्क राशीतील प्रवेशानंतर शनी ग्रहाशी षडाष्टक योग जुळून येऊ शकेल. आताच्या घडीला शनी कुंभ राशीत विराजमान आहे. याशिवाय राहु, गुरु, बुध आणि सूर्य हे मंगळापासून दहाव्या स्थानी असतील. मंगळाचे गोचर काही बाबतीत प्रतिकूल मानले जात असले तरी सौम्य राशीतील प्रवेशाचा काही राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. (mars transit in cancer 2023)
3 / 9
मंगळाचा कर्क राशीतील प्रवेश काही राशींना सकारात्मक ठरू शकतो. नोकरी, करिअर, व्यवसाय, बिझनेस, आर्थिक आघाडीवर उत्तम संधी, लाभप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मंगळाचे गोचर नेमक्या कोणत्या राशींना अनुकूल, फलदायी ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. वैवाहिक जीवनातील नाराजी दूर होऊ शकेल. कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंध सुधारतील. उत्पन्न वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी कामगिरी सुधारू शकेल. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मंगळाच्या शुभ प्रभावाने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश इच्छापूर्तीकारक ठरू शकेल. अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर यावेळी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जोडीदाराशी वाद वाढू शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल, परंतु यशामुळे तणाव कमी होऊ शकेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. आर्थिक समस्या कमी होऊ शकतील. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत हा काळ उत्कृष्ट ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात. खर्च कमी करून काही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश प्रगतीकारक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. कौटुंबिक आणि कार्यालयीन कामांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असू शकते. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. कार्यालयात पदोन्नतीची शक्यता आहे. अधिकार वाढू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा कर्क प्रवेश शुभ प्रभावाचा ठरू शकेल. विरोधक पराभूत होतील. कामाच्या ठिकाणी कामगिरी उत्कृष्ट राहू शकेल. आतापर्यंत पुढे जाण्यात जे अडथळे येत होते ते दूर होऊ शकतात. नोकरीत कौतुक होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. चुकीची संगत टाळा आणि मेहनतीने काम करण्याचा सल्ला दिला जात आहे.
9 / 9
मंगळाच्या कर्क प्रवेशासोबत बुध मेष राशीत मार्गी होणार आहे. तसेच अस्तंगत असलेला बुधाचा उदय होणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच शुक्र मे महिन्यात दुसऱ्यांदा राशीपरिवर्तन करून मंगळासह कर्क राशीत विराजमान होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य