शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळी शुभ होईल! मंगळाचा मिथुन प्रवेश ‘या’ ७ राशींना अत्यंत मंगलमय, लाभच लाभ; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 1:30 PM

1 / 15
ज्योतिषीय दृष्टिने ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या राशीपरिवर्तानांपैकी महत्त्वाचा राशीबदल म्हणजे मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत होत असलेला प्रवेश. १६ ऑक्टोबर रोजी मंगळ राशीबदल करत आहे. मंगळाचा मिथुन प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. (mangal gochar in mithun rashi 2022)
2 / 15
शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीतून मंगळ ग्रह १६ ऑक्टोबर रोजी बुधचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करत आहे. यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मंगळ याच राशीत वक्री होत आहे. तर वक्री मार्गाने १३ नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह पुन्हा एकदा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. (mars transit in gemini october 2022)
3 / 15
मंगळाच्या मिथुन प्रवेशाने शनीसोबत षडाष्टक योग जुळून येत आहे. हा योग देश-दुनियेसाठी शुभ मानला गेलेला नाही. मंगळाचा मिथुन प्रवेशाचा सर्वच राशींवर प्रभाव दिसून येणार आहे. काही राशींना हा अत्यंत लाभदायक ठरणार असून, काही राशीच्या व्यक्तींना हा कालावधी संमिश्र ठरणर आहे. तुमच्या राशीवर मंगळाच्या मिथुन प्रवेशाचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. धैर्य आणि आक्रमकपणा वाढेल, परंतु कुटुंबातील लहान सदस्य किंवा भावांसोबत मतभेद वाढू शकतात. प्रवासाचा फायदा होऊ शकेल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. तुमची उर्जा आणि सामर्थ्य यांच्या मदतीने तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात कराल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश साधारण ठरू शकेल. मानसिक अस्वस्थता राहू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या कालावधीत कोणालाही कर्ज म्हणून जास्त पैसे देऊ नका, अन्यथा दिलेले पैसे वेळेवर मिळणार नाहीत. जिद्द आणि आवड नियंत्रणात ठेवून तुम्ही योजना गोपनीय ठेवल्यास तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. अनावश्यक वादांपासून दूर राहा.
6 / 15
मिथुन राशीत होत असलेला मंगळ ग्रहाचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. आप्तेष्ट तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होणार नाहीत. या काळात कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळा. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकेल. घेतलेल्या निर्णयाचे आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. कोणत्याही प्रकारच्या सरकारी निविदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास त्या दृष्टीनेही ग्रह संक्रमण अनुकूल राहील.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. जास्त धावपळ होऊ शकेल. खर्च वाढू शकतील. परदेशात राहणारे मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता. जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठी अनुकूल काळ. न्यायालयीन खटल्यांमध्येही सकारात्मक वृत्त मिळू शकते. अनेकवेळा तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही जे कष्ट करत आहात तेवढे फळ मिळत नाही. मात्र, त्यातील नकारात्मकता टाळा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. एवढे सगळे करूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाची परिस्थिती येऊ शकेल. मोठ्या भावंडांसोबत मतभेद वाढू देऊ नका.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात नशीब आजमावायचे असेल तर संधी चांगली आहे, फायदा घ्या. सरकारी खात्यांमध्ये टेंडरसाठी अर्ज करायचा असला तरी संधी अनुकूल राहील. विद्यार्थी वर्गालाही अभ्यासासाठी परदेशात जायचे असेल तर लाभदायक काळ. मुलाची जबाबदारी पार पाडाल. संततीविषयक चिंता दूर होऊ शकतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. तुम्ही करत असलेल्या कामात सुरुवातीला अडथळे येतील, पण शेवटी यश मिळेल. तुमच्यातील उर्जा, शक्तीच्या सहाय्याने तुम्ही अगदी कठीण प्रसंगांवर नियंत्रण ठेवू शकाल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा किंवा व्हिसा इत्यादीसाठी अर्ज करणे देखील यशस्वी होईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. जीवनात चढ-उतार येऊ शकतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कामाच्या ठिकाणी षड्यंत्रापासून दूर राहावे. वादविवाद टाळा. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. विचित्र परिस्थिती असूनही तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश सामान्य ठरू शकेल. विवाह विषयक प्रकरणांमध्ये थोडा विलंब होऊ शकेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागातील प्रलंबीत कामे पूर्ण होऊ शकतील. सासरच्या मंडळींसोबत काही मतभेद वाढू शकतात. तुम्ही तुमची रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केल्यास तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. आप्तेष्टांच्या कारस्थानांवर बारीक लक्ष ठेवणे हिताचे ठरू शकेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश यशकारक ठरू शकेल. मोठे यश मिळेल. कोणतेही मोठे काम सुरू करावे लागले किंवा कोणाशी करार करावा लागला, तर अनुकूल काळ. प्रवासामुळे फायदा होऊ शकेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा आणि नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील, मित्र आणि नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. विशेषत: विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांच्यासोबत वाद टाळावा. मुलांची जबाबदारी पार पाडाल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. नोकरीत बढती आणि नवीन करार मिळण्याचीही शक्यता आहे. प्रवास करताना तुमच्या वस्तूंची अधिक काळजी घ्या. नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता. काही ना काही कारणाने तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. तुमचेच लोक तुमचा अपमान करतील याची काळजी घ्या. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य