शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ केतुची युती: ५ राशींसाठी शानदार, यश-प्रगतीची संधी; धनलाभाचे शुभ योग, इच्छापूर्ती काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 1:56 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिना विशेष ठरणार आहे. कारण नवग्रहांपैकी सहा ग्रहांचे गोचर होणार आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आताच्या घडीला कन्या राशीत असून, ०३ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीत छाया ग्रह असलेल्या राहु-केतुंपैकी केतु ग्रह विराजमान आहे.
2 / 9
मंगळाच्या तूळ राशीतील प्रवेशानंतर मंगळ आणि केतुचा युती योग जुळून येत आहे. तर, मेष राशीतील राहु आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्याने राहु-मंगळाचा समसप्तक योग जुळून येत आहे. या तीनही ग्रहांचा समसप्तक योग आणि युती योग फारसा अनुकूल मानला जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि केतु उग्र ग्रह मानले जातात.
3 / 9
असे असले तरी ५ राशींना मंगळ आणि केतुची युती अनुकूल आणि लाभदायक ठरू शकणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी केतु तूळ राशीतून वक्री चलनाने कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे ऑक्टोबरचा महिना या ५ राशींना जीवनाच्या विविध स्तरांवर उत्तम लाभ, यश-प्रगतीची संधी, आर्थिक आघाडीवर अनुकूलता लाभू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युती योगाचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. मोठे निर्णय घेण्याची हिंमत वाढेल. हे निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्याची हीच वेळ आहे. ज्यांचा व्यवसाय परदेशात आहे त्यांच्यासाठी ही युती फायदेशीर ठरेल. तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. दैनंदिन उत्पन्नही वाढेल.
5 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युती योगाचा अप्रत्यक्षरित्या उत्तम लाभ मिळू शकतो. आर्थिक आघाडीवर तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतील. आर्थिक योजनांचा फायदा मिळू शकेल. माध्यम आणि इतर सर्जनशील व्यवसायांशी संबंधित असलेल्यांसाठी उत्कृष्ट परिणाम देणारे सिद्ध होईल.
6 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युती योगाचा चांगला आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतो. परदेशातून पैसा मिळू शकेल. शेअर बाजाराशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवू शकाल. भौतिक सुखसोयी मिळविण्याची इच्छा वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून, मित्रांकडून सहकार्य मिळेल. पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. दृष्टीकोन खूप सकारात्मक असेल. व्यापारी वर्गाला एखादी मोठी निविदा किंवा ऑर्डर मिळू शकते. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युती योगाचा नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. करिअरसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. बर्‍याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अनेक उत्तम संधी मिळू शकतात. करिअरमध्ये इच्छित बदल घडून येऊ शकतील. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. उद्योगाशी संबंधित असलेल्यांना अनेक आकर्षक सौदे आणि उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळ-केतु युती योग शानदार ठरू शकेल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. उच्च शिक्षण घेणार्‍या लोकांसाठी ही चांगली वेळ असेल. मेहनतीचे फळ तुम्हाला यशाच्या रूपाने मिळेल. काही विद्यार्थ्यांना नवीन उत्साहवर्धक नोकर्‍या मिळाल्याने त्यांचे भविष्य चांगले असेल. खर्च प्रचंड वाढला असला तरी उत्पन्नही लक्षणीय वाढेल. परदेशात कुठेतरी सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक जीवनात होणारे बदल बाजूने असतील. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील.
9 / 9
मंगळाच्या तूळ प्रवेशानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह १७ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत विराजमान होईल. लगेचच १८ ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे तूळ राशीत बुधादित्य आणि त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य