शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तूळ वक्री: ‘या’ ५ राशींना आव्हानात्मक काळ; असावे कायम अलर्ट, नेमके काय करू नये? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 3:10 PM

1 / 9
ऑक्टोबर महिन्या दसरा, दिवाळी यांसारखे सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात अगदी देशभरात साजरे करण्यात आले. याच महिन्यातील नवग्रहांपैकी काही अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांनी राशीपरिवर्तन केले, तर नवग्रहांचा न्यायाधीश शनी याच महिन्यात मार्गी झाला. (mangal vakri in mithun 2022)
2 / 9
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे. मंगळाचे वक्री चलन मिथुन राशीत फार कमी काळ राहील. मंगळ ग्रह १३ नोव्हेंबरपर्यंत मिथुन राशीत वक्री असेल आणि त्यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. (mars retrograde in gemini 2022)
3 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, मंगळ ग्रहाच्या वक्री चलनाचा काही राशींवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. मंगळ वक्री झाल्यानंतर काही राशीच्या लोकांच्या स्वभावात चिडचिड, राग आणि आक्रमकता वाढू शकेल. तसेच करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
4 / 9
विशेष म्हणजे याच ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान झाला होता. आता अगदी काही दिवसांनंतर मंगळ ग्रह याच राशीत वक्री होत आहे. तर नोव्हेंबर महिन्यात वक्री चलनाने पुन्हा वृषभ राशीत जाईल. या आगामी काळ कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील आक्रमकता वाढू शकेल. तुमचे कोणाशी तरी भांडण होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक दबाव वाढू शकतो. धनप्राप्तीचे प्रयत्नांना यश येईलच असे नाही.
6 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकतो. आक्रमक बोलण्यामुळे तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे वाद आणखी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत भावांसोबत वाद होऊ शकतो. लव्ह लाइफच्या बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतो. खर्चही वाढू शकतात.
7 / 9
मिथुन राशीतच मंगळ वक्री होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ संमिश्र ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवावे. तुमची कोणतीही छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. विवाहित लोकांच्या आयुष्यातही अनेक समस्या उद्भवू शकतात. पैशाच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेणे सध्या टाळा.
8 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकेल. वडिलांसोबत वाद होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. करिअरच्या बाबतीत तुम्हाला बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. मंगळाचा प्रतिकूल प्रभाव तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो. तुम्हाला धैर्याने परिस्थितीचा सामना करावा लागेल.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकेल. प्रवास करताना अतिशय काळजी घ्यावी. दुचाकी संथ गतीने चालवा. मंगळाच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मालमत्ता खरेदी करणार असेल तर हा धोका पत्करू नका. ते तुमचे नुकसान करू शकते. सुविधांच्या अभावामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य