शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मार्च देणार डोक्याला ताप : 'या' सहा राशींचे उत्पन्न होणार कमी, बजेट सांभाळताना मारामारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:52 IST

1 / 7
२ मार्चपासून शुक्र मीन राशीत पूर्वगामी होणार आहे आणि प्रतिगामी होऊन शुक्र ६ राशीच्या लोकांना संपत्ती, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अडचणी निर्माण करणार आहे. शुक्र धन, विलास, प्रणय आणि आकर्षणाचा कारक आहे. शुक्राच्या उलट्या हालचालीचा आर्थिक परिस्थिती, प्रेम इत्यादींवर नकारात्मक प्रभाव पडतो. तो प्रभाव कोणत्या राशींवर पडणार ते पाहू!
2 / 7
शुक्राचा पूर्वगामी प्रभाव ५ राशीच्या लोकांना त्रास देईल मात्र वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठा लाभ देऊ शकतो. नवीन संधी मिळतील. नोकरीत बढती मिळेल. येत्या काळात तुम्हाला अपेक्षित गुड न्यूज मिळेल. मात्र पुढील राशींना जरा सावधच राहावे लागेल!
3 / 7
प्रतिगामी शुक्राचा तुमच्या जीवनातील अनेक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पडेल. प्रेम जीवनात मतभेद होऊ शकतात. पैसे वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी होतील. उत्पन्नात घट होऊ शकते. व्यवसाय मध्यम राहील. अनावश्यक खर्च टाळा, सेव्हिंग करा, ते पैसे पुढे कामी येतील.
4 / 7
शुक्र पूर्वगामी असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे बजेट बिघडेल. आजारपणावर पाण्यासारखा खर्च होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी भांडण होऊ शकते. संयम बाळगा, धीर धरा. आर्थिक संकट ओढावेल पण सबुरीने त्यातून मार्ग काढता येईल.
5 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. अपेक्षित काम पूर्ण न झाल्याने चिंतीत राहाल. करिअर आणि आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने कठीण काळ आहे. घरात अकारण वाद विवाद होतील. तुम्ही मौन बाळगा. वादातून काढता पाय घ्या. मार्च अखेरीस मालमत्तेतून लाभ होऊ शकतो.
6 / 7
कन्या राशीच्या लोकांनी नात्यात सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे. लव्ह लाईफ असो की वैवाहिक जीवन, मैत्री असो की कौटुंबिक नाती, त्यात कटुता येऊ शकते. कामाचा ताण राहील. पैसा वाया जाऊ शकतो. सगळे निर्णय सांभाळून घ्या.
7 / 7
वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात पैसा अतिशय जपून वापरावा. करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तब्येत बिघडू शकते. नोकरीत अडचण येऊ शकते. घरात वादविवाद होऊ शकतात. सबुरीने घेतले नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य