शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्र-मंगळाची युती: ५ राशींची कमाई वाढेल, सुख-समृद्धी योग; नोकरीत प्रगती, ३० दिवस लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 7:19 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह ०६ जुलै रोजी राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्र कर्क राशीतून सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान होणार आहे. (mars and venus conjunction leo 2023)
2 / 9
जून महिन्याच्या अखेरीस नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान झाला आहे. धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, यांसह अनेक गोष्टींचा मंगळ ग्रह कारक मानला गेला आहे. सिंह राशीत शुक्र आणि मंगळाचा युती योग जुळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात शुक्र वक्री होऊन कर्क राशीत जाणार आहे. तोपर्यंत मंगळ आणि शुक्राची युती असेल. (mangal shukra yuti in simha rashi 2023)
3 / 9
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असेल, अशा व्यक्तींना धन-धान्य, सुख-समृद्धी यांची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. मंगळ आणि शुक्र युतीचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो. नोकरी, कार्यक्षेत्र, व्यापार, व्यवसाय यांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
4 / 9
मंगळ आणि शुक्र युती ५ राशीच्या व्यक्तींना लकी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. शुक्राचा सिंह राशीत होत असलेला प्रवेश महत्त्वाचा मानला गेला आहे. याचा सर्व राशींवर प्रभाव पडू शकेल. मात्र, कोणत्या राशींना आगामी काळ सुखकारक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आनंददायी ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांमधील जुने वाद दूर होऊ शकतील. आनंदाचे वातावरण राहू शकेल. एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या तर त्या दूर होऊ शकतील. जे इव्हेंट मॅनेजमेंट आणि कलात्मक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल ठरू शकेल. या काळात उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र युतीचा काळ सकारात्मक ठरू शकेल. मित्रांची संख्या वाढलेली दिसेल. काही प्रवास करावे लागतील. नोकरदारांना सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले स्थान मिळवू शकाल. प्रेम जीवन खूप चांगले असेल. मन प्रसन्न राहील. भरपूर पैसा मिळू शकेल.
7 / 9
सिंह राशीत मंगळ विराजमान झालेला असून, शुक्राचा प्रवेश होत आहे. वैवाहिक जीवनासाठी आगामी काळ अनुकूल असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरदारांना कुटुंब आणि त्यांचे काम यांच्यात चांगले संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल.
8 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक सिद्ध होऊ शकेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल. पैसे मिळवण्याच्या नवीन संधी खुल्या होतील. आर्थिक समस्या दूर करण्यात यश मिळू शकेल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहू शकाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र युतीचा कालावधी सुख संपन्नता आणणारा ठरू शकेल. जोडीदारामध्ये असलेले गैरसमज दूर होतील. आयात-निर्यात क्षेत्रात असणाऱ्यांना भरपूर नफा कमावण्याची संधी मिळू शकेल. लव्ह लाइफच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य